Mediclaim Insurance Policy – आरोग्य विमा

Mediclaim किंवा Health Insurance Policy म्हणजेच काय तर मराठीमध्ये आरोग्य विमा असे ही आपण म्हणतो. आपण काहीसं वैद्यकीय भरपाई आरोग्य विमा योजना असंही म्हणू शकतो. आर्थिक बाबतीत समजून घेतलं तर आपली जोखीम काही प्रमाणात कमी होते. तसेच अश्या प्रकारची पॉलिसी आपल्या हॉस्पिटलच्या खर्चासह हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापासून ते कोणत्याही विशिष्ट आजार आणि उपचारासह खर्च पुरवते.

मेडिक्लेम पोलिसी म्हणजे काय?

अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा अपघातामुळे २४ तासा पेक्षा अधिक कालावधीसाठी किंवा २४ तासा पेक्षा कमी कालावधी साठी अगोदरच इन्शुरन्स कंपनी कडून दावा(claim) मंजूर करून एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयात मध्ये भरती (Admit) व्हावे लागल्यास आणि खिशाला न परवडणारा खर्च इन्शुरन्स (Insurance) कंपनी कडून कॅशलेस (Cashless) अथवा अगोदर पैसे भरून मग अशी बिले इन्शुरन्स कंपनीत दाखल करून अश्या खर्चाची भरपाई (Reimbursement) परत मिळवता येते.

मेडिक्लेम पॉलिसीची आवश्यकता का आहे?

१) अचानक हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागल्यास खर्चाची पूर्वकल्पना आणि पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण येतो.

2) काही वर्षांपासून बँक खात्यात जमा केलेले पैसे काढावे लागणार, त्यामुळे अचानक पैसे संपून जाणार.

3) जर बँकेत आणि पोस्टात एफडी, आरडी केलेली असेल, त्यातून ही पैसे काढावी लागणार.

4) हिरे,सोन्याचे दागिने गहाण ठेवावे लागणार किंवा विकावे लागणार.

5) स्टॉक, बॉण्ड्स, म्युच्युअल फंड विकावे लागतात.

6) आपले नातेवाईक आणि मित्र मंडळी यांच्याकडूनही उसने पैसे मागावे लागतात.

7) पैसे व्याजाने घ्यावे लागतात.

8) घर, गाडी आणि जमीन हे सुद्धा गहाण ठेवावे अथवा विकावे लागतात.

9) आजारपणावर खर्च करण्यासाठी अजून तरी कर्ज सुविधा उपलब्ध नाहीत.

10) जर वेळेत पैसे उपलब्ध न झाल्यास, आपल्या प्रिय जणांचा जीव गमवावा लागू शकतो.

मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कोणते खर्च मिळतात?

1) खोलीभाडे (Room Rent)

2) नर्सिंग चार्जेस (Nursing Charges)

3) डॉक्टर तपासणी चार्जेस (Doctor Consulting Charges)

4) डॉक्टर फेरी चार्जेस (Doctor Round Charges)

5) आय.सी.यु चार्जेस (ICU Charges)

6) एन.आय.सी.यु चार्जेस (NICU Charges)

7) गोळ्या, औषधे, सलाइन खर्च(MEDICINES Charges)

8) सोनोग्राफी खर्च (SONOGRAPHY)

9) एम.आर.आय खर्च (MRI Charges)

10) सिटी स्कॅन खर्च (सिटी स्कॅन)

11) रक्त लघवी तपासणी खर्च (Blood Urine Test)

12) प्लेटलेस (Platless) पिशवी

13) रक्त पिशवी खर्च

14) लॅबोरेटरी तपासण्याचे खर्च (SPECIAL LABORATORY Tests)

15) रुग्णवाहिका खर्च (AMBULANCE)

16) ओपरेशन थेटर खर्च (OPERATION Theater Charges)

17) डॉक्टर सर्जरी खर्च( DOCTOR Surgery Charges)

असे व आणखी इतर खर्च मिळतात पण हे तपासून पाहावे लागेल.

मेडिक्लेम पॉलिसी असेल तर…!

1) आपल्याला मानसिक आणि आर्थिक ताण येत नाही. त्यामुळे अश्या कोणत्याही प्रकारच्या हॉस्पिटल खर्चाला सामोरे जाण्याची तयारी असते.

2)हॉस्पिटलमध्ये आगऊ पैसे भरण्याची कमी गरज पडते.

3) व्याजावर(काही लोक असे कर्ज देऊ करतात) पैसे घ्यायची गरज नाही.

४)घर, गाडी, जमीन, प्लॉट, फ्लॅट, दुकान विकण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ येत नाही.

4) खूप चांगल्या रुग्णालयात उत्तम प्रकारची सेवा आपल्याला मिळते.

5) नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडे उसने पैसे मागण्याची वेळ येत नाही.

6) कोठेही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता येते.

मेडिक्लेम पॉलिसीचे काही मुद्दे:

फॅमिली कव्हर: आपल्या कुटुंबातील व्यक्तींना वैद्यकीय विमा संरक्षण मिळते. तसेच काही व्यक्तिगत स्वरूपाचे मेडिक्लेम सुद्धा असतात.

मेडिक्लेम लिमिट: म्हणजे ठरावीक हप्त्याला मेडिक्लेममार्फत एकूण किती पैसे मिळणार याबद्दलची मर्यादा.

कॅशलेस: हॉस्पिटलमध्ये सेवा घेतल्यानंतर हॉस्पिटलचा जो काही बिल झाला असेल म्हणजेच ती रक्कम न देता विमा कंपनीने हॉस्पिटलचे बिल भरणे, त्यालाच आपण ‘कॅशलेस’ म्हणू शकतो.

ते हॉस्पिटल त्या विमा कंपनीच्या मान्यताप्राप्त हॉस्पिटलच्या यादीत असणे आवश्यक आहे. जर याव्यतिरिक्त इतर हॉस्पिटलमध्ये पेशंटला स्वत: बिल भरून त्याचा ‘क्लेम’ कंपनीकडे द्यावा लागतो.

गटविमा: एखाद्या कंपनीने आपल्या कामगारांसाठी घेतलेली एकत्रित विमा योजना गटविमा म्हणजे. जर कंपनीमध्ये कामगारांची संख्या मोठी असेल तर विम्याचा हप्ता कमी ठरतो.

अपघात विमा: अपघात झाल्यास उपचारासाठी होणारा खर्च देणारा विमा कंपनी देते. आणि जर मृत्यू झाल्यास त्याबद्दल डेथ बेनिफिट म्हणून अधिक भरपाई मिळते.

नो क्लेम बोनस: आपण मेडिक्लेम पोलिसी घेतलेली आहे, पण त्या वर्षी आपण कोणतीही वैद्यकीय भरपाई न घेतल्यास मिळणारा बोनस नो क्लेम बोनस. आणि पुढील वर्षी विमा सुरु ठेवला तरच काही प्रमाणात सूट मिळते.

तुमचा निर्णय:

जेव्हा आपल्याला Mediclaim किंवा Health Insurance Policy – आरोग्य विम्याची आवश्यकता नसते, तेव्हा तो घेतला पाहिजे आणि जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित मेडिक्लेम पॉलिसी मिळणार नाही आणि जरी मिळाला तरी आपल्याला त्याचा फायदा ताबडतोब होणार नाही.

Mediclaim किंवा Health Insurance Policy बाजारात खूप साऱ्या पॉलिसी उपलब्ध आहेत. आपण मेडिक्लेम पॉलिसी म्हणजेच आरोग्य विमा घेताना, वरील सर्व गोष्टींचा विचार आणि अभ्यास करूनच तसेच योग्य सल्लागाराच्या मदतीने पोलिसीची निवड करावी.

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आपल्यावर ओढवल्यावर काय अवस्था होते ते या लेखातून समजू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्द्ल तुमचा अभिप्राय कळवा. लवकरच भेटू!
नवीन विषय! नवीन लेख! फक्त आपल्या मराठी मातृभाषेत!
सारा इन्वेस्ट्मेन्ट्स
सुहास जोगळे

Categories: Investment

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *