The Right Financial Advisor – योग्य आर्थिक सल्लागार

रात्री 8 – 8.30 वाजले असतील, आमची रोजची जेवायची वेळ. आम्ही जेवायला सुरुवात करणार इतक्यात मोबाईलची रिंग वाजली. माझ्या एका पुण्यातील मामाचा फोन होता. खूप महिन्यांनी फोन केला होता, त्यामुळे विचारपूस करण्यासाठी फोन केला असेल, मला असं वाटलं. मामा त्याच्या एका वेगळ्या Style मध्ये म्हणला, “काय शेट, काय करताय?

”मी म्हटलं “काही नाही रे! जेवायला बसणार होतो.”

“तू जेवण करून घे, मग फोन कर” असं तो म्हणाला.

अरे मामा एक मिनिट थांब हा! फोन ठेऊ नकोस. आपण बोले पर्यंत, मी आमच्या सोनूला(माझी मुलगी) जेवण भरवायला सांगतो.” आणि मी माझ्या बायकोला मुलीला जेवण भरवायला सांगितलं. “हा मामा आता बोल. ”मामा म्हणतो “काय तू मोठा माणूस झालास,” मी जरा उत्साहित होऊन, हो म्हणालो, “तू म्हणतोस ना, तर नक्कीच मोठा असणार!”

मामा विचारतो की, “तुझं काम कसं सुरु आहे, अरे इन्वेस्ट्मेन्ट्सचं(Investments)…”

मी: “OK…OK ते होय!…ठीक चाललं आहे.”

कारण त्याला अगोदर पासूनच महित होतं, मी गुंतवणूकी संबंधित(Investments Related)काम करतो.

मामाला गुंतवणूकीतून आलेला अनुभव…

मामा म्हणाला “अरे मी 3 वर्षापासून मुच्युअल फंडात गुंतवणूक करत आहे. अरे मी जिथे काम करतो, त्या शेटच्या(मालक) भाच्याने माझी गुंतवणूक केली आहे.”

मी विचारलं, “किती रुपये गुंतवले आहेत.”

त्याने 3 लाख रुपये एकाच फंडात एकरक्कमी ठेवले आहेत. आणि प्रतीमहिना 3 हजार रुपयांची एसआयपी(SIP)आहे. मी Current Statement तपासून पाहिलं, तर माझी गुंतवणूक कमी(Minus) झालेली दिसते. ज्या व्यक्तीने माझे पैसे गुंतवले आहेत, त्याने मला सुचत ही केलं नाही. आणि त्याचा कॉन्टॅक्ट ही होतं नाही? तर काय करायचं? कारण त्यामुळे मला टेन्शन आलं आहे.”

मी त्याला म्हटलं, “तू आधी शांत हो, आणि टेन्शन घेऊ नकोस. एक गोष्ट लक्ष्यात ठेव, तुझे पैसे कुठेही जाणार नाहीत. अगोदर तू मला WhatsApp वर स्टेटमेंट पाठव. मी Check करून उद्या तुला सांगतो.”

“ठीक आहे” असं म्हणून मामाने फोन ठेवला.

मग त्याने WhatsApp वर स्टेटमेंटचे फोटो पाठवले होते. ते मी Check केले तेव्हा माझ्या असे लक्ष्यात आलं की, ३ एसआयपी(SIP)आहेत, ते फंड कमी कामगिरी(under-performance) करणारे आहेत. आणि ३ लाख रुपये अश्या एका फंडात ठेवले आहेत की, समजा एखाद्या कठीण प्रसंगात जर त्याला पैसे हवे असतील तर तो काढू(Withdrawal/Redeem) शकत नाही. म्हणजेच काय बंद प्रकारचे फंड(Close Ended Fund) असतात त्यामध्ये गुंतवले होते.

माझा समजावण्याचा प्रयत्न…

सर्व प्रकार माझ्या लक्ष्यात आला. मी दुसऱ्या दिवशी परत फोन केला. मी मामाला सांगितलं की, “कोरोणामुळे जगातील सर्वच शेअर्स मार्केट खाली आहेत. आणि केव्हा वर येईल हे सांगू शकत नाही. हा! आणि शेअर्स मार्केट(Share market) कायस्वरूपी खाली राहणार नाही. ही परिस्थिती आज आहे तशी राहणार नाही, ती बदलणार हे नक्कीच. तोपर्यत आपल्याला वाट बघावीच लागेल. तुझी मुद्दल रक्कम कमी झाली आहे आणि आपण आता तुझे जुने फंड बदलायचा प्रयत्न केला, तर तुला नुकसान होईल. मी मामाला विश्वास दिला, तुला एक रुपयाचं ही नुकसान होऊ देणार नाही. पण कृपया Wait कर काही महिने.”इतकं सांगितल्यावर त्याला हायसं वाटलं.

“मामा, हे बघ लोकांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढून, त्यांना स्वावलंबी बनवणे, त्यांना मार्ग दाखवणे हे माझं कामच आहे. त्यांना नुकसान होता कामा नये, याकडे माझे जास्त लक्ष्य असते.”मग आम्ही एकमेकांना Bye केलं आणि फोन ठेवला. 

मित्रांनो आपणवरील गोष्टीमधून काय शिकणार?

मित्रांनो मामा बरोबर बोलल्यावर त्याचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला. त्याने गुंतवलेल्या पैशाबद्दल त्याला एक प्रकारची असुरक्षितता जाणवत होती. पण याचं कारण मला समजलं, आणि मी शोधण्याचा प्रयत्न केला. ज्या व्यक्तीद्वारे त्याने पैसे गुंतवले आहेत, त्याच्याकडे कॉन्टॅक्ट होऊ शकत नव्हता आणि त्यांनी ते पैसे अश्या फंडात ठेवले होते की, जास्त नाही पण योग्य परतावा मिळेल का? कमीतकमी माझी मुद्दल रक्कम तरी परत मिळेल का? याची सुरक्षितता त्याला वाटत नव्हती? माझ्या मामाला तसं वाटणं साहजिकच आहे, कारण तो तर एक सामान्य गुंतवणूकदार आहे. नाही की, खूप मोठा गुंतवणुकदार!

पण इथे मामाला Right financial advisor कडून योग्य आर्थिक सल्ला घ्यायला हवा होता, त्याने उत्साहाच्या भरात निर्णय घ्यायला नको हवा होता. मला तुम्हाला हेच सांगायचे आहे की, आपला आर्थिक सल्लागार आपल्या गरजेनुसार, आपले आर्थिक लक्ष्य साध्य करण्यासाठी गुंतवणुकीतले फायदे-तोटे, धोके आणि परतावा लक्ष्यात घेऊन गुंतवणुक करण्यासाठी नियोजन करून देतो. थोडक्यात काय तर एक “ROAD MAP” तयार करून देतो.तर मामाच्या बाबतीत काहीसं तसचं झाला आहे, तर मी त्याला मदत करणार आहे.

पण त्याआधी मी तुम्हाला आर्थिक सल्लागार आणि आर्थिक उत्पादनांचे वितरक या दोघांमधील फरक समजावून आपल्यासाठी कोण योग्य आहे. या बद्दल थोडसं मार्गदर्शन करू इच्छितो.आपण आर्थिक सल्ला(Financial Advice) घेताना, काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करायलाच हवा.त्यापूर्वी आर्थिक उत्पादनांचे वितरक आणि आर्थिक सल्लागार यामधील फरक समजून घेऊ! म्हणजे तुमच्या लक्ष्यात येईल, की आर्थिक सल्ला कोणाकडून घ्यायचा ते!

आर्थिक उत्पादनांचे वितरक(Agent): 

  • हे फक्त आपल्या आर्थिक उत्पादना(Financial Product) बद्दलच चर्चा करतात.
  • त्यांचे एखादे उत्पादन घेण्यास तुम्हाला प्रवृत्त करत असतात.
  • ग्राहकांचे हित लक्ष्यात घेत नाहीत.
  • कारण त्यांना विक्री करायची असते. कारण त्यांना Target Complete करायचे असते.
  • अश्या वेळी सादर केलेली अशी उत्पादने आपल्यालाच निवडावी लागतात.
  • त्यामुळे बहुतेक वेळी, नुकसान सहन करावे लागते.
  • कारण त्याबद्दल आपल्याला पुरेसी माहिती नसते.  

आर्थिक सल्लागार(Financial Advisor):

  • ग्राहकांची आर्थिक पार्श्वभूमी(Financial Background) नीट जाणून घेतो.
  • गुंतवणुकीतले धोके(Risk) आणि परतावा(Returns) यासंदर्भात सविस्तर चर्चा करतो.
  • नेमकी ग्राहकाची गरज काय आहे, हे आधी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो.
  • ग्राहकाची आयुष्यातील आर्थिक उद्दिष्टे(Financial Goals) कोणती आहेत याबद्दल माहिती करून घेतो.सखोल अभ्यास आणि विश्लेषण करून योजना तयार करतो.
  • त्यानुसार आर्थिकदृष्ट्या सुरक्षित पद्धतीने कुठे व किती गुंतवणूक करायची यासाठी मार्गदर्शन करतो.
  • आर्थिक उत्पादन ग्राहकाच्या गरजेनुसार आवश्यक नसेल तर तेथेच ते व्यवहार थांबवणे पसंत करतो.
  • अनावश्यक आर्थिक उत्पादनाची विक्री करत नाही.

आर्थिक उत्पादनांचे वितरक(Agent) आणि आर्थिक सल्लागार(Financial Advisor)यातील फरक समजून घेतल्यावर, विचार करा, आपल्यासाठी कोण योग्य (Right financial advisor) आहे आणि नंतरच गुंतवणुकीचा निर्णय घ्या.

तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्द्ल तुमचा अभिप्राय कळवा. लवकरच भेटू!
नवीन विषय! नवीन लेख! फक्त आपल्या मराठी मातृभाषेत!
सारा इन्वेस्ट्मेन्ट्स
सुहास जोगळे


0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *