Medical Emergency Situation- वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती

मित्राने Whats App वर ट्रेकिंग साठी जायचं Location Share केलं होतं. मी याआधी कधीच ट्रेकिंगसाठी गेलो नव्हतो, पण यावेळी मला उत्सुकता वाटली. जर आपल्याकडे वेळ आहे, तर जायलाच पाहिजे असं मला वाटलं.

म्हणून मी मित्राला कॉल केला, तेव्हा त्याने सर्व Trekking Planning समजावून सांगितली. शिवाय त्यासाठी काही अत्यावश्यक वस्तू काय-काय हव्या आहेत त्याचीही List मला पाठविली.

त्याने आखलेली Planning(योजना), मला आवडली आणि त्याचबरोबर खर्चही कमी होणार होता. म्हणून मी हो म्हटलं. आम्ही ट्रेनने १०-१२ जण जाणार होतो, म्हणून सर्वांना मित्राने सांगितलं होतं की ट्रेनसाठी Reservation करा, सर्वानी Reservation केले होते.

मग मी टीशर्ट, ट्रॅक पॅन्ट, टॉर्च, ट्रेकिंगसाठी वापरायचे शूज, इत्यादी घेतले. माझ्याकडून सर्व तयारी झाली होती.
I was very excited to go for trekking.

ट्रेकिंगसाठी जायचा दिवस…

जायचा दिवस जवळजवळ येत होता, तसं मला खूपच exciting वाटतं होतं. पण ज्या दिवशी आम्ही ट्रेकिंगसाठी जाणार होतो. त्याच्या दोन दिवस अगोदर, मला Whats app वर समजलं.

की त्या मित्राच्या आईला हृदयविकाराचा झटका आला आहे, तेव्हा त्यांना जवळच्या हॉस्पिटल मधे Admit केलं आहे. I was shocked little bit!

मी मनात म्हटलं अरे हे काय झालं.
कसं आहे ना, जर कोणी नातेवाईक, मित्रमंडळी यांपैकी कोणी जरा जास्त आजारी असेल आणि आपल्याला माहित पडलं, तर आपल्याला दुःख होतं. पण अशी परिस्थिती ओढवल्यावर त्याचा सामना तर करावाच लागतो.

ट्रेकिंगला जायचं रद्द झालं…

मग आम्ही सर्वानी ट्रेकिंगला जायचं Cancel केलं.
जसं मला माहित पडलं, तसं मी मित्राकडे विचारपूस करण्यासाठी फोन करत होतो. पण माझा Contact काही झाला नाही. मग ट्रेकिंग-ग्रुप मधील मित्रांकडे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. तर एक-दोघांकडे Contact झाला. त्यांना हि जास्त काही माहिती नव्हती. विचार केला की Message करूया.

मग दोन दिवसांनी मित्रानेच Message केला, “आईला हॉस्पिटलमधे ऍडमिट केलं आहे.”
मी म्हटलं “हो मला समजलं आहे.” पण नक्की काय झालं आहे.
तो म्हणाला की, “किरकोळ हृदयविकाराचा झटका आला आहे”(Minor heart attack).
मी म्हटलं “डॉक्टर काय म्हणत आहेत.”

मित्र म्हणाला की, “सर्व टेस्ट करून झाल्या,” पण “बायपास शस्त्रक्रिया(bypass surgery)करायला सांगतली आहे.”

मी दीर्घ श्वास घेऊन, “OH MY GOD!…काय बोलतो” असं म्हणालो.
(हार्ट बायपास शस्त्रक्रिया किंवा कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट (सीएबीजी) शस्त्रक्रिया आपल्या हृदयात रक्त प्रवाह सुधारण्यासाठी केली जाते.)

मी मनात म्हटलं, तरीच हा खूप टेन्शनमधे आहे.

शस्त्रक्रिया करण्यासाठी उडालेली तारंबळ…

आणि जेव्हा बायपास शस्त्रक्रिया करायला सांगितलं असं म्हणाला, तेव्हा मला 7 ते 8 महिन्यांपूर्वीची एक गोष्ट आठवली.

माझे एक जवळचे सर आहेत, त्यांच्या बाबांना पण बायपास शस्त्रक्रिया करायला सांगितली होती. तेव्हा त्यांना जवळपास 4 ते 5 लाख रुपये खर्च आला होता. म्हणून मला “किती खर्च येईल, याचा अंदाज आला होता.”

4-5 लाख रुपये ऑपरेशनसाठी खर्च करायचं म्हटलं, तर तूर्तास आपल्या डोक्यात खर्चाचा डोंगर उभा राहतो. आणि त्याचमुळे तर Tension वाढते.

पण आपल्या माणसाचा जीव त्याहीपेक्षा लाखमोलाचा आहे.

आणि जरी आपली आर्थिक परिस्थिती उत्तम असो किंवा नसो, त्यासाठी आपल्याला काहीही करायला लागलं तरी ते आपण करतोच करतो.
पण आपल्या सामान्य लोकांकडे इतके पैसे असतात का? अपवाद वगळता, मुळात नसतातच. आता का नसतात? हा विषय वेगळा आहे, यावर कधीतरी मी वेगळं लिहीन.

होय मग इतके पैसे कसे जमवणार?

कारण डॉक्टरने जर सांगितलं आहे, तर ऑपरेशन तर करावंच लागणार. इतकी मोठी रक्कम गोळा करणे सामान्य माणसाला नाही जमत, आणि त्याचमुळे आपल्या जवळच्या व्यक्तीचा जीव गमवावा लागतो.

असं विचार करून अंगावर काटा येतो. अश्यावेळी Emotional होऊन नाही चालत, त्यावेळी Practical व्हाव लागतं.

पैसा कसा उभा करायचा…

माझा मित्र वैद्यकीय अडचणीत(Medical Emergency) होता. पैसा कसा उभा करायचा याचेच प्रयत्न खूप सुरु होते.

शिवाय आई ऍडमिट असताना हॉस्पिटलचा खर्च, वेगवेगळ्या टेस्ट या खर्त्याचामुळे त्याच्याकडे होते ते 40-50 हजार रुपये अगोदरच संपायला आले होते.

पण ऑपरेशन तर करायचं होतं. त्यासाठी वेगळे पैसे लागणार होते. आणि जरी ऑपरेशन झालं तरी त्यानंतर Routine Checkup साठी ही पैसे हवेतच की.

काय करावं काही कळत नव्हतं. खरंच अश्यावेळी खरंच काही समजायला मार्ग नसतो.

बरं इतर नातेवाईक तरी इतके पैसे कसे देणार, शिवाय त्यांच्याकडे ही असायला हवेतच की! शिवाय मित्राने कोणताही मेडिकल इन्शुरन्स घेतला नव्हता.

खूप प्रयत्न केल्यावर त्याला एका सरकारी योजेने बद्दल माहिती मिळाली. त्यातून त्याच्या आईचं ऑपरेशन यशस्वी झालं. हा आता मित्रांची आई ठीक आहे.

पण या सरकारी योजनेचा लाभार्थी होण्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली.

कारण सरकारी कामांची एक प्रक्रिया असते आणि ते पूर्ण केल्याशियाव त्याचा लाभ घेता येत नाही. आणि अश्या कामांना वेळतर लागतोच.

नशीब म्हणा, पण त्याच्या आईच्या ऑपरेशनसाठी वेळ होता, म्हणून शक्य झालं.

काही दिवसांनी मी त्याला फोन केला होता, की सर्व ठीक आहे ना! तर तोच म्हणाला की, आज मला समजलं की, “आजच्या काळात मेडिकल इन्शुरन्स किती महत्वाचं आहे.”

मित्रांनो आपण या गोष्टीमधून काय शिकणार?

बघा ज्या प्रमाणे माझ्या मित्रावर वैद्यकीय परिस्थिती ओढवली तशी कोणावरही येऊ नये. पण अश्या प्रकारच्या परिस्थिती काही सांगून येतात का?
तर उत्तर आहे “नाही.”

मग जरी आपली आर्थिक परिस्थिती अधिक चांगली असो किंवा नसो, अशी वेळ केव्हाही आणि कोणावरही येऊ शकते.

आपल्याला हे ही महित हवं की, दिवसेंदिवस मेडिकल खर्च(Expenses) झपाट्याने वाढत आहेत.

तर त्यासाठी आपण तशी काही तरदूद करून ठेवतो का? तर “नाही”

अशी एका व्यक्तीवर परिस्थिती आली, पण समजा अजून कुटूंबातील दुसऱ्या व्यक्तीवर परिस्थिती आली तर, मग त्यासाठीपण सरकारी योजना शोधत राहायच्या का?
शिवाय असतील-नसतील तेवढे पैसे मेडिकलसाठी खर्च होणार. असा खर्च केव्हाही येऊ शकतो.

एक सत्य आहे की माणूस “आपल्या स्वतःच्या इन्शुरन्स पेक्षा, गाडीचा इन्शुरन्स असणे जास्त महत्वाचा समजतो.”
स्वतःचा जीव महत्वाचा नाही, पण माझी गाडी मात्र तुटली-फुटली नाही पाहिजे. अरे बाबा जर जीव वाचला तर एक गाडी काय 10 गाड्या घेता येतील. पण जर जीव नाही राहिला तर एकही गाडी विकत घेऊ शकणार नाही.

काय करायला हवं…

आपल्याला काय करायला हवं, पुरेसा मेडिएकल इन्शुरन्स हवा आहे. कारण मेडिकल इन्शुरन्स कंपनी सर्व खर्च करतात. कारण त्यासाठी आपण हप्ता(Premium) देतोच की.

बाजारात वेगवेगळे मेडिकल प्लॅन उपलब्ध आहेत, तुम्हाला जो योग्य वाटेल आणि तुम्ही पूर्ण माहिती मिळवून किंवा Insurance Advisor च्या योग्य सल्लाने घेऊ शकता.

बघा माझ्या मित्रासारखी (Medical Emergency Situation)वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती कोणावरच येऊ नये. त्यासाठी तुम्ही नेहमीच तयार असले पाहिजेत.

आपण आपल्या कुटूंबाची मेडिकल जबाबदारी एक योग्य जबाबदार कुटुंब-प्रमुख म्हणून घ्यायला हवीच की!

तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्द्ल तुमचा अभिप्राय कळवा. लवकरच भेटू!
नवीन विषय! नवीन लेख! फक्त आपल्या मराठी मातृभाषेत!
सारा इन्वेस्ट्मेन्ट्स
सुहास जोगळे


0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *