लिक्विड फंड (Liquid Mutual Funds)

लिक्विड फंड हे डेट म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे. सरकारी कोशागार देयके(treasury Bills), सरकारी सेक्युरिटीज, कमर्शिअल पेपर्स, मुदत ठेवी(Fixed deposits). 

आणि इतर कोणत्याही प्रकारच्या कर्ज सिक्युरिटीज(Debt Securities) अश्या प्रकारच्या अल्पमुदतीच्या गुंतवणूक बाजारांमध्ये पैसे गुंतविले जातात. 

त्यामुळे या गुंतवणुकीच्या या प्रकाराला सध्या अधिक पसंती मिळत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे बचत खात्यावरील व्याजाहून अधिक या फंडातून परतावा मिळतो. 

सर्वात कमी जोखीम व आपल्या गरजेनुसार पैसे केव्हाही काढता येतात शिवाय पैसे काढण्यासाठी अर्ज केल्यास 24 तासात तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतात.

कमी जोखीम(Low Risk):

लिक्विड फंडात सर्वात कमी जोखीम असते असे मत आर्थिक नियोजन सल्लागारांचे आहे. बाजारातील चढउतारांचा परिणाम म्युच्युअल फंडांवर होत असतो. मात्र अश्या फंडांवर बाजारातील चढउतारांचा अत्यल्प परिणाम होतो. त्यामध्ये या प्रकारचे फंड येतात.

उच्च पत मानांकन(High credit rating) असलेल्या गुंतवणुकीत पैसे ठेवले जात असल्या कारणाने यातील जोखीम कमी होते.

अपेक्षित परतावा(Expected return):

लिक्विड फंडांत 6-7 टक्क्यांनी परतावा अपेक्षित आहे. आणि आपल्या बँकेच्या बचत खात्यापेक्षा या फंडातील परतावा हा अधिक असतो.

समजा एखाद्या गुंतवणूकदाराने विमोचन विनंती(Redemption Request)केली तर त्याच्या खात्यामध्ये या फंडाची रक्कम परताव्यासह/व्याजासह जमा होते.

आणि या फंडांवर एण्ट्री(Entry )अथवा एग्झिट(Exit) लोड आकारला जात नाही.

गुंतवणूक योग्य वेळ(Right time to invest):

आपल्याकडे जमा असलेले किंवा अतिरिक्त पैसे कमी कालावधीसाठी म्हणजेच 1 ते 90 दिवसांसाठी गुंतवू शकतो.

समजा तुम्हाला TV सेट घ्यायचा आहे, आणि याचे नियोजन तुम्ही एक वर्षासाठी करत असाल, तर त्यासाठी आवश्यक रक्कम तुम्हाला हवी असल्यास या फंडात पैसे ठेऊ शकता.

बचत खाते अथवा मुदत ठेवीमधून जेवढा परतावा मिळतो, त्याहून अधिक परतावा हे फंड देऊ शकतात.

एसआयपी(SIP) किंवा एकत्रित मोठी(Lumpsum) रक्कमेद्वारे काही गुंतवणूकदार या फंडात गुतंवणूक करत असतात.

करआकारणी स्वरूप(Taxation form):

तीन वर्षांनंतर या फंडातील रक्कम काढली तर त्यावर दीर्घमुदत भांडवली नफा कर (Long Term Capital Gain Tax) द्यावा लागतो.

आणि जर तीन वर्षांच्या आत यातील रक्कम काढली तर गुंतवणूकदाराच्या वैयक्तिक करस्तरानुसार (Tax Slab) कर द्यावा लागतो.

बचत खाते(Savings Account) आणि मुदत ठेवीं(Fixed Deposit) मध्ये मिळणारा व्याज कर मुक्त नसतो. करआकारणीचा सामान्य गुंतवणूकदाराने जास्त विचार करू नये.

खालील काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे:

पैसे फार कमी कालावधीसाठीच ठेवले जातात, गुंतवलेल्या पैशाचे मूल्य कमी न होता पैसे जिथे आहेत तिथे सुरक्षित राहतील याची खात्री असेल, तर मग त्यात मिळणारा परतावा कमी असला तरी चालेल अशा ठिकाणीच ठेवावा.

कालावधी नक्की नसेल किंवा माहिती सुद्धा नसेल. तरी मुदत ठेवीमध्ये पैसा ठेवणे योग्य ठरु शकते, पण त्यालाही काही मर्यादा आहेत. मुदत ठेवीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यामध्ये पैसा सुरक्षित असतो.

परंतू त्यातील एका मर्यादेला आपण ब-याचदा दुर्लक्षित करतो की, पैसे एका निश्चित कालावधीसाठीच ठेवता येतात आणि पैसे ठेवण्याच्या कालावधीमध्ये कोणतीही परिवर्तनशीलता नसते.

अशा परिस्थितीमध्ये लिक्विड फंड (Liquid Mutual Funds) विचार केला जाऊ शकतो. यातसुद्धा पैशाची सुरक्षा असते, शिवाय चांगला परतावा मिळतो. आणि पैसे केव्हाही काढून घेण्याची मुभा असते. 

तेव्हा सामान्य गुंतवणूकदारांपासून ते उच्च गुंतवणूकदारांपर्यंत लिक्विड म्युच्युअल फंडांचा विचार करू शकतात.

म्युच्युअल फंड म्हणजे काय हे अधिक जाऊन घेण्यासाठी येथे क्लिक करा

सूचना: म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांना गुंतवणुक करायची असल्यास आपल्या गुंतुवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे अथवा आपण स्वतः करत असल्यास आपणास म्युच्युअल फंडाचे पूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे.

तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्द्ल तुमचा अभिप्राय कळवा. लवकरच भेटू!नवीन विषय! नवीन लेख! फक्त आपल्या मराठी मातृभाषेत!
सारा इन्वेस्ट्मेन्ट्स
सुहास जोगळे

Categories: Mutual Funds

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *