Become Self-Reliant – आत्मनिर्भर बना!
माझा एक मित्र आहे, हितेश त्याचं नाव आहे. तो हि छोटा-मोठा व्यवसाय करतो. एकदा त्याने मला त्याच्या दुकानात बोलावलं, कारण त्याला गुंतवणुकीबद्दल माहिती हवी होती आणि मीही त्याला ती सांगितली. जवळपास आमची २ तास गुंतवणुक कशी करावी यावर चर्चा झाली. त्याला मी सांगितलं, आपल्याला आपल्या पायावर उभं राहायचं आहे. म्हणजेच काय तर आर्थिकदृष्ट्या सक्षम बनायचं आहे, कोणावर ओझं बनून राहता कामा नये. अशी चर्चा करत असताना मला त्याच्याकडून काही गोष्टी समजल्या. मग मी प्रश्न – उत्तर अश्या पद्धतीने त्याला सांगायला सुरुवात केली.
त्याला विचारलं कि, याआधी कुठे गुंतवणूक केली आहे का? त्याचं उत्तर होतं, ते सर्व व्यवहार बाबा बघतात. मी म्हटलं, ठीक आहे. मग पैसे कुठे-कुठे ठेवले आहेत, तो बोलला कि बँकेत फिक्स्ड डिपॉझिट मध्ये आहेत, बऱ्याच LIC पोलिसी आहेत. तो पुढे म्हणाला की, मी मला खर्चाला थोडे ठेवतो, बाकीचे सर्व पैसे बाबांकडे देतो. मग माझ्या सर्व प्रकार लक्ष्यात आला.
अजून मी शांतपणे एकूण घेतलं, आणि त्याला सांगायला सुरुवात केली, बघ मित्रा पारंपरिक गुंतवणूकीचे पर्याय वाईटच आहेत असे नाही, पण या गुंतवणूकीवरील मिळणारे व्याज हे किती आहे याबद्द्ल ही माहीत नसेलच, कारण महागाई ज्या वेगात वाढत आहे त्या वेगात आपले पैसे वाढायला हवेतच की! पण तसं नाही होत, कारण पारंपारिक गुंतवणुकीवरील व्याज हे आजच्या महागाईवर मात नाही करू शकत.
तुमचे पैसे कुठे कुठे खर्च होणार…?
तुमच्या प्राथमिक गरजा भागविण्यात सर्व पैसे खर्च होणार.
मग तुझ्या लग्नासाठी पैसे हवेत, लाखभरात होणारं लग्न आता नाही होऊ शकत, शिवाय मुल झाल्यावर ते पहिलीला जाण्याअगोदर वर्षाची शाळेची फी लाखभर असते, पुढे त्यांचं प्राथमिक, माध्यमिक, आणि उच्च शिक्षण हे ही करावं लागणार आहे, यासाठी पैसे कुठून आणणार! पुढे सांगितलं की, तुझ्या बाबांचा प्रॉब्लेम नाही, कारण त्यांना पारंपरिक गुंतवणूकी व्यतिरीक्त इतर पर्याय माहीतच नसणार!
यात तु चूक करत आहेस, कारण अजून काही गुंतवणूकीचे खात्रीशीर पर्याय आहेत का? हे तपासून पहिलं पाहिजे. कारण पैशाची Value दिवसेंदिवस कमी होत जात आहे, शिवाय आपली मोठमोठी स्वप्ने असतात की मुंबईत आपला आलिशान फ्लॅट हवा, महागडी कार हवी, महागडे कपडे, देश-विदेश सहली हे सर्व कधी पूर्ण करणार?
जेव्हा आपण शाळा-कॉलेज मध्ये होतो, स्वतः अभ्यास करावा लागे, परीक्षा आपल्यालाच द्यावी लागे, बाबा किंवा आई आणि इतर कोणी हे सर्व करत नव्हते. पेपर मधे काय लिहायचं आहे त्याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागत असे. मग आज आपण कमावते झाल्यावर इतर कोणावर का अवलंबून राहावे, हा सुद्धा प्रश्न आहे ना!
तेव्हा निर्णय आपल्यालाच घ्यावा लागणार आहे आणि आपण पाहिलेली सर्व स्वप्ने आपल्यालाच पूर्ण करावी लागणार आहेत!
म्हणून स्वतः आत्मनिर्भर बना(Become Self-Reliant)!
पारंपरिक गुंतवणूक व्यतिरिक्त इतर गुंतवणूकीचे काही पर्याय आहेत का? ते माहीत करून घ्या!
त्याविषयी माहिती मिळावा, वर्कशॉप, सेमिनार, काही पुस्तके वाचा, तज्ञ मंडळींचा सल्ला घ्या! चांगल्या भविष्यासाठी थोडा त्रास घेण्यास काहीच हरकत नाही.
कोणा दुसऱ्यांच्या हातात देऊन आयुष्य जगू नका, तर आर्थिक दृष्टया सक्षम होऊन अमर्याद आयुष्य जगा!
हे माझ्या मित्राला सर्व सांगितल्यावर तो खुष झाला, आणि त्याने आता माझे निर्णय माझेच मीच घेणार, हे ही मला सांगितलं.
आत्मनिर्भर बना! आत्मनिर्भर होऊन जगा!
तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्द्ल तुमचा अभिप्राय कळवा. लवकरच भेटू!
नवीन विषय! नवीन लेख! फक्त आपल्या मराठी मातृभाषेत!
सारा इन्वेस्ट्मेन्ट्स
सुहास जोगळे
0 Comments