Categories: Financial Planning

5 Stages Of Wealth Creation – संपत्ती निर्मितीच्या पायऱ्या

5 Stages of Wealth Creation – संपत्ती निर्मितीच्या 5 पायऱ्या

संपत्ती निर्मिती विचारात घेताना आपण कोणत्या स्तरावर किंवा पायरीवर उभे आहोत हे अगोदर तपासणे महत्वाचे आहे. तर चला अश्या कोणत्या संपत्ती निर्मितीच्या 5 पायऱ्या आहेत ते आज आपण समजून घेणार आहोत.

पायरी क्र. 1: आर्थिक स्थिरता(Financial Stability)

आपला सध्याचा मासिक खर्च आहे, त्याखर्चाएवढी किमान 3 ते 6 महिने पुरेशी बचत असायला हवी. असं तुम्हाला वाचायला किंवा ऐकायला मिळेल. पण आजकाळच्या वाढत्या महागाईच्या काळात आपल्याला 6 ते 12 महिने पुरेल ऐवढी बचत करायलाच हवी. असे कोण-कोणते मासिक खर्च या पायरीमध्ये समाविष्ट असायला हवेत? तर घर खर्च, किराणा सामान, इंधन, हॉटेल जेवण, करमणूक खर्च, कपडे, बिले- वीज, पाणी, गॅस, फोन, इंटरनेट इत्यादी.

आपण काही उदाहरणे पाहूया:

उदा.1 तुमचा महिन्याचा खर्च 15000 हजार रुपये आहे. तर 15000×3(महिने)=45,000/-

उदा.2 तुमचा महिन्याचा खर्च 15000 हजार रुपये आहे. तर 15000×6(महिने)=90,000/-

उदा.3 तुमचा महिन्याचा खर्च 20000 हजार रुपये आहे. तर 20000×6(महिने)=1,20,000/-

उदा.4 तुमचा महिन्याचा खर्च 25000 हजार रुपये आहे. तर 25000×12(महिने)=3,00,000/-

मित्रांनो तुम्ही वरील उदाहरणावरून अंदाज घेऊ शकता, आपल्याला 3, 6 किंवा 12 महिने गृहीत धरून आपल्याला किती बचत करावी लागेल, हे पाहावे लागेल.

पायरी क्र. 2: आर्थिक सुरक्षा(Financial Security)

संपत्तीची पुढची पायरी म्हणजे आर्थिक सुरक्षा. तुमच्या गुंतवणूकीतून मिळणारे उत्पन्न किंवा इतर निष्क्रीय उत्पन्न(Passive Income) आपला किमान खर्च आणि मूलभूत जीवनशैली यासारख्या गरजा भागवू शकतात. यामध्ये आपल्या कुटुंबासाठी आरोग्य सेवा, प्रवास, शाळा किंवा महाविद्यालय शुल्क इत्यादी.

पायरी क्र. 3: आर्थिक स्वातंत्र्य(Financial Independence)

संपत्तीची पुढची पायरी म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य होय, जेव्हा आपल्या गुंतवणूकीतून आपल्याला काही प्रमाणात ठराविक उत्पन्न मिळेल, तेव्हाच आपण आपले किमान खर्च आणि असे खर्च त्यांना आपण प्राधान्य देऊ इच्छित आहोत.  यामध्ये रेस्टॉरंट्समध्ये जाणे, ब्रँडेड कपडे, स्वदेशातील सहली इत्यादी.

पायरी क्र. 4: आर्थिक मुक्तता(Financial Freedom or Free)

आपले सध्याचे मासिक खर्च आणि आपल्या सध्याच्या जीवनशैलीशी तडजोड न करता आपल्या गुंतवणूकीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून सर्व खर्च भागवू शकतो. संपत्ती निर्मित्तीच्या या पातळीवर पोहोचण्याचा अर्थ असा आहे की आपल्याला पुन्हा कधीही काम करावे लागणार नाही आणि आपली सध्याची जीवनशैली आपण कायम तसीच ठेऊ शकतो. यामध्ये लक्झरी कार, काही परदेशातील सहली इत्यादी. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? हे अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

पायरी क्र. 5: आर्थिक विपुलता(Financial Abundance)

संपत्तीची शेवटची पायरी म्हणजे आर्थिक विपुलता होय जर आपल्या सध्याच्या गुंतवणूक पोर्टफोलिओचा आकार मोठा असेल, तर त्यातून निष्क्रीय उत्पन्न मोठ्याप्रमाणात निर्माण होऊ शकतं, आणि यामुळे काय होईल तर आपल्याला पाहिजे असलेली कोणतीही गोष्ट आणि आपल्या स्वप्नातील जीवनशैली आपण हवं तसं सहज जगू शकतो.  यामध्ये लक्झरी कार, विदेशी जीवन शैली, तसेच अनेक परदेशातील सहली इत्यादी.

मित्रांनो आपण (5 Stages Of Wealth Creation)संपत्ती निर्मितीचे 5 टप्पे किंवा पायऱ्या पाहिलेल्या आहेत, तेव्हा आपण वरील पैकी कोणत्या स्थितीत किंवा पायरीवर आहात हे तपासा?मित्रांनो आपण कोणत्या टप्प्यावर पोहचू इच्छित आहात, याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे.

तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्द्ल तुमचा अभिप्राय कळवा. लवकरच भेटू!
नवीन विषय! नवीन लेख! फक्त आपल्या मराठी मातृभाषेत!
सारा इन्वेस्ट्मेन्ट्स
सुहास जोगळे

SARA Investments

Recent Posts

Mediclaim Insurance Policy for Family – आरोग्य विमा

Mediclaim Insurance Policy - आरोग्य विमा Mediclaim किंवा Health Insurance Policy म्हणजेच काय तर मराठीमध्ये… Read More

9 months ago

The Right Financial Advisor – योग्य आर्थिक सल्लागार

The Right Financial Advisor - योग्य आर्थिक सल्लागार रात्री 8 – 8.30 वाजले असतील, आमची रोजची जेवायची वेळ.… Read More

10 months ago

Liquid Funds – लिक्विड फंड

लिक्विड फंड (Liquid Mutual Funds) लिक्विड फंड हे डेट म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे. सरकारी कोशागार देयके(treasury Bills), सरकारी सेक्युरिटीज,… Read More

10 months ago

Medical Emergency Situation – वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती

Medical Emergency Situation- वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती मित्राने Whats App वर ट्रेकिंग साठी जायचं Location Share… Read More

10 months ago

CORONA and my relative – कोरोना आणि माझा नातेवाईक

CORONA and my relative - कोरोना आणि माझा नातेवाईक मित्रांनो आता तुम्हाला माहीतच आहे, कोरोना(COVID-19)… Read More

10 months ago

Become Self-Reliant – आत्मनिर्भर बना

Become Self-Reliant - आत्मनिर्भर बना! माझा एक मित्र आहे, हितेश त्याचं नाव आहे. तो हि… Read More

10 months ago