Categories: Financial Planning

What is Financial Planning? आर्थिक नियोजन म्हणजे काय?

आर्थिक(financial planning) नियोजन म्हणजे काय?

सामान्य किंवा श्रीमंतलोक असोत प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही तरी आर्थिक ध्येय किंवा लक्ष्य असतातच आणि हे आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजन(Financial Planning) करणे गरजेचे असते. आज भारतात आर्थिक साक्षरता हे एक मोठे आव्हान आहे.

आज ही खूप लोकांना मूलभूत आर्थिक नियोजन संकल्पना समजत नाही आणि ते आर्थिक साक्षरता(Financial Literacy) वाढविण्याच्या दिशेनेही काम करत नाहीत.

आर्थिक नियोजन या दोन शब्दांवरूनच आपल्या लक्ष्यात आलं असेल. आपण खूप वेळा ऐकले ही असतील. पण हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. पण ते आपण खालीलप्रमाणे पाहूया:

Financial: या शब्दाचा मराठी अर्थ आहे: पैसा, वित्त

Planning: या शब्दाचा मराठी अर्थ आहे: योजना आखणे किंवा तयार करणे

भविष्यातील आर्थिक गरजा पूर्णकरण्यासाठी लागणारा निधी किंवा पैसा आणि असे उद्दिष्ट गाठण्यासाठी तयार केलेली आर्थिक योजना म्हणजेच आर्थिक नियोजन होय .

आता आर्थिक नियोजन करताना आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी लक्ष्यात घेणे आहे. जसं की आपली आताची आर्थिक परिस्थिती काय आहे? आणि अशी कोण-कोणती आपली ध्येय आहेत, जी आपल्याला भविष्यात पूर्ण करायची आहेत? आणि या ध्येयांसाठी आपण गुंतवणुक जोखीम घेण्यासाठी तयार आहोत का? पहिलं आपल्याला हे समजून घेण गरजेचं आहे.

1. महागाई(Inflation):

आपण काही वर्षापूर्वी चित्रपट पाहायला सिनेमा गृहात जायचो त्यावेळी 50 रुपये तिकीट होती पण आज मल्टिप्लेक्समध्ये जातो, तर तिकीट आहे 250 रुपये किंवा त्याही पेक्षा जास्त.

एखाद्या चहाच्या Stall वर चहा 4-5 रुपयात मिळायची, पण आज कमीत कमी रुपये 10. याचं कारण म्हणजे महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे.

उदा. आज उच्च शिक्षणासाठी जर रूपये 25 लाख लागत असतील आणि महागाईचा दर वर्षाला 7% असेल तर 15 वर्षानंतर त्याच उच्च शिक्षणासाठी 68.97 लाख रुपये लागतील.

म्हणून वाढत्या महागाईवर मात करण्यासाठी आपल्याला आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.

2. तात्काळ निधी(Emergency Fund):

आपत्कालीन परिस्थिती किंवा घटना कोणत्याही प्रकारच्या असू शकतात. 

जसे – वैद्यकीय आपत्कालीन(Medical emergencies), अपघात(Accident), कार खर्च(Car expenses), घर दुरुस्ती(Home repairs), नोकरी गमावणे(Job loss), किंवा जीवनशैली(lifestyle) खर्च इत्यादी.

उदा. समजा तुम्ही नोकरी  करत आहात. महिन्याचा उत्पन्न 60 ते 70 हजार रुपये आहे. पण जर कोणत्याही कारणामुळे नोकरी गमवावी लागली तर आपण या तात्काळ निधीचा वापर करू शकतो. तो निधी(Fund) कमीत कमी 6 ते 12 महिन्याचा असायला हवा आहे.

उदा. 60 हजार रुपये (महिना उत्पन्न) x 6 महिने धरले = 3.60 लाख. आपल्याकडे तात्काळ निधी असायलाच हवा. आपल्याल दुसरी नोकरी मिळत नाही तोपर्यंत आपण या निधीवर काही खर्च भागवू शकतो.

3. विमा नियोजन(Insurance Policy):

हे सुद्धा महत्वाचे आहे. आज माणसाला काय होईल हे सांगू शकत नाही. म्हणजेच कोणतीही वैद्यकीय(Medical Emergency) गरज लागू शकते. आज आपण पाहिलं तर मेडिकलचा खर्च इतका वाढलेला आहे की आपले डोळे पांढरे होतात. कारण हा खर्च अनपेक्षितपणे उद्भवतो आणि असे खर्च काही सांगून येत नाहीत. आणि जर अशी वेळ आली तर आपण केलेली बचत यात पूर्णपणे संपून जाऊ शकते. म्हणून आर्थिक नियोजनात विमा हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. कारण आपल्याकडे विमा संरक्षण असायलाच हवे. हे जर असेल तर आपल्या वैद्यकीय गरजेची पूर्ण जबाबदारी विमा कंपन्या घेऊ शकतात. आणि आपले कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहू शकते.

4. गुंतवणूक नियोजन(Investment Planning):

आर्थिक नियोजन करताना गुंतवणूक नियोजन हे खूप महत्वाचे आहे. कारण आपले आर्थिक ध्येय ही वेगवेगळी असू शकतात. त्याप्रमाणे आपल्याला तशी गुंतवणूक करावी लागते. आणि ती सुरक्षितपणे करावी लागते. मुलांचे उच्च शिक्षण आणि लग्न, महागडी कार, मोठ घर, देश किंवा परदेश प्रवास आणि बरेच काही.

5. निवृत्ती नियोजन(Retirement Planning):

उत्पन्नाची सुरक्षा,  ज्यातून तुम्हाला नियमित उत्पन्न मिळत राहते (निवृत्तीनंतरचे उत्पन्न)

उदा. माझं वय 30 वर्षे आहे. आणि माझा महिन्याचा खर्च 40 हजार आहे. आणि समजा मी माझ्या वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्ती घेतली.

आणि मी 85 वर्षापर्यंत जिवंत राहिलो. आणि महागाई 6% राहिली. तर मला निवृत्तीसाठी 3.45 कोटी रुपये लागतील.

6. पैशाचे व्यवस्थापन(cash flow Management):

आर्थिक नियोजनामुळे आपल्या पैशाचे व्यवस्थापन योग्य होते. कारण भविष्यात लागणाऱ्या वेगवेगळ्या आर्थिक ध्येयासाठी किती निधी लागणार आहे.

त्याप्रमणे आपण गुंतवणूक करत असतो, त्यामुळे वायफळ खर्चही कमी होतात. त्यामुळे आपले आर्थिक लक्ष्य गाठण्यासाठी पैशाच्या व्यवस्थापनाची मदद होते आणि आपण हळूहळू आर्थिक दृष्ट्या ही सक्षम बनतो जातो.

प्रत्येक व्यक्तीसाठी, त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे हे त्याच्या जीवनाचे ध्येय आहे, जे त्याच्या वैयक्तिक यशाशी देखील संबंधित आहे.

पण एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे-

आपल्या सर्वांना आर्थिक गरज पूर्ण करण्यात यश मिळते काय? – तर उत्तर आहे – “नाही”,

केवळ 5% लोक आर्थिक यश मिळवतात आणि उरलेले 95% अपयशी ठरतात. कारण कोणत्या ना कोणत्या आर्थिक चक्रव्युहात ते अडकले असतात.

आर्थिक नियोजन(financial planning) का महत्वाचे आहे?

कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी किती नियोजन महत्त्वाचे आहे हे सांगण्याची तुम्हाला गरज नाही. आपले आर्थिक यशदेखील आपल्या आर्थिक योजनेवर अवलंबून असते. आर्थिक यश मिळविण्यासाठी आर्थिक योजना आखणे फार महत्वाचे आहे.

काही आर्थिक नियोजनाची(Financial Planning) उद्दीष्टे:

  • आर्थिक नियोजनेमुळे नको असलेले खर्च नियंत्रित करू शकता. यामुळे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत मिळते.
  • उत्पन्न आणि खर्च यांच्यात योग्य समतोलपणा ठेऊ शकता.
  • आर्थिक योजनेच्या मदतीने पैशाची उत्तम प्रकारे गुंतवणूक करता येते.
  • अशी गुंतवणूक ज्यातमध्ये कमी धोका असतो आणि जास्तीत जास्त लाभ मिळतो जे आपली आर्थिक उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे.
  • आर्थिक योजनामुळे योग्य कर नियोजन, निवृत्ती नियोजन आणि काही लहान-मोठे आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी मदत मिळते.
  • आर्थिक योजनेच्या मदतीने आपण आपल्या कुटुंबास योग्य विमा संरक्षणासह मुलांच्या भविष्यास आर्थिक सुरक्षा प्रदान करू शकतो. जेणेकरून कुटुंबातील कोणालाही अनपेक्षित परिस्थितीत इतर कोणाकडूनही आर्थिक मदत घ्यायची गरज नाही.
सर्वोत्तम वैयक्तिक आर्थिक टीपा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्द्ल तुमचा अभिप्राय कळवा. लवकरच भेटू!
नवीन विषय! नवीन लेख! फक्त आपल्या मराठी मातृभाषेत!
सारा इन्वेस्ट्मेन्ट्स
सुहास जोगळे

SARA Investments

Recent Posts

Mediclaim Insurance Policy for Family – आरोग्य विमा

Mediclaim Insurance Policy - आरोग्य विमा Mediclaim किंवा Health Insurance Policy म्हणजेच काय तर मराठीमध्ये… Read More

2 years ago

The Right Financial Advisor – योग्य आर्थिक सल्लागार

The Right Financial Advisor - योग्य आर्थिक सल्लागार रात्री 8 – 8.30 वाजले असतील, आमची रोजची जेवायची वेळ.… Read More

2 years ago

Liquid Funds – लिक्विड फंड

लिक्विड फंड (Liquid Mutual Funds) लिक्विड फंड हे डेट म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे. सरकारी कोशागार देयके(treasury Bills), सरकारी सेक्युरिटीज,… Read More

2 years ago

Medical Emergency Situation – वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती

Medical Emergency Situation- वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती मित्राने Whats App वर ट्रेकिंग साठी जायचं Location Share… Read More

2 years ago

CORONA and my relative – कोरोना आणि माझा नातेवाईक

CORONA and my relative - कोरोना आणि माझा नातेवाईक मित्रांनो आता तुम्हाला माहीतच आहे, कोरोना(COVID-19)… Read More

2 years ago

Become Self-Reliant – आत्मनिर्भर बना

Become Self-Reliant - आत्मनिर्भर बना! माझा एक मित्र आहे, हितेश त्याचं नाव आहे. तो हि… Read More

2 years ago