72 सूत्राचा नियम – The Rule of 72 Formula

आपण गुंतवणूक म्हणजे काय आहे ते पाहिलेले आहे. परंतु आपली केलेली गुंतवणूक किती दिवसात वाढेल किंवा दुप्पट होईल हे माहित आहे का? तर तुमचं उत्तर असेल “नाही” पण आज आपण 72 सूत्रांचा नियम वापरून आपल्याला हे समजेल की आपण केलेली गुंतवणूक किती दिवसात दुप्पट होईल.

मित्रांनो पण 72 सूत्राचा नियम काय आहे? आणि ते कसं कार्य करतं? तसेच 72 सूत्राचा नियम वापरून कसा फायदा करून घेऊ शकतो हे आज आपण आज पाहणार आहोत.

72 सूत्र नियम(Rule of 72) काय आहे?

फायनान्समध्ये एक 72 सूत्राचा नियम हे सूत्र आहे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले गुंतवणूक मूल्य दुप्पट करण्यास किती वेळ लागेल याचा अंदाज आपण घेऊ शकतो.

प्रत्येक गुंतवणूकदारास गुंतवणूक करताना त्याला असं वाटत असतं की गुंतवणूकीवर अधिक चांगला परतावा मिळवायला हवा. आणि त्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक करायला हवी. म्हणून आपल्याला काही वेगवेगळ्या गुंतवणूकीवरील उत्पन्नाची तुलना करण्यासाठी काही गणिती सूत्र वापरावे लागतील.

आणि अशा गणिताचे सूत्र वापरुन एखाद्या गुंतवणूकीचा फायदा मिळवणे त्यानंतर त्या गुंतवणूकीची दुसर्‍या गुंतवणूकीशी तुलना करणे हे खूप अवघड काम आहे.

उदाहरणार्थ जर मी तुम्हाला असं सांगितलं की पोस्ट ऑफिस योजना आवर्ती ठेव(Recurring Deposit) चा वार्षिक व्याज दर 9% आहे. तर किती दिवसात 9% वार्षिक व्याज दराने तुमचे पैसे दुप्पट होतील?

तर मला हे सांगणे थोडे अवघड आहे – किती दिवसात 9% वार्षिक व्याज दराने तुमचे पैसे दुप्पट होतील?

असं कसं सांगणार, काहीतरी सूत्र वापरायला हवं तरच आपण सांगू शकतो. म्हणून 72 सूत्राचा नियम हा आपल्या समस्येवरील उपाय आहे. 72 सूत्राचा नियम वापरुन आपण विचारलेल्या वरील प्रश्नाचे उत्तर फारच थोड्या वेळात देऊ शकता की किती दिवसांत 9% दराने पैसे दुप्पट होतील? होय, हे अगदी सोपे आहे, ते कसे आहे ते जाणून घेऊया.

हा नियम कसं काम करतो ते खालील प्रमाणे:

Rule of 72 Formula

72 सूत्राचा नियम(Rule of 72 Formula):

72 / गुंतवणूकीवरील परताव्याचा दर(Rate of Return)= कालावधी

वरील उदाहरणात, 72 आणि गुंतवणूकीवरील परतावा दर 9%, म्हणजेच 72/9 = 8 वर्षे 

आपण हे पाहिलं असेल की हे किती सोपं गणित आहे, आपण गुंतवणूकीवरील परताव्याच्या दराला फक्त 72 ने भाग दिला तर आपली गुंतवणूक दुप्पट होण्यास किती वेळ लागेल हे समजते.

आपण गुंतवलेले पैसे किती दिवसात दुप्पट होतील हे आपल्याला माहित करून घ्यायचे असेल तर गुंतवणूकीवरील परताव्याच्या दराला फक्त 72 ने भागाकर करा. म्हणजे काही सेकंदात तुम्हाला उत्तर मिळेल.

आहे ना सोपं! 72 सूत्राचा नियम किती सोपं सूत्र आहे.

72 सूत्राचा नियम(Rule of 72 Formula) याची काही उदाहरणे पाहूया:

  • तुमचे 25,000 रुपये किती दिवसात 4% वार्षिक परताव्याने दुप्पट होतील?

उत्तर = 72/4 = 18 वर्षे

  • तुमचे 30,000 रुपये किती दिवसात 8% वार्षिक परताव्याने दुप्पट होतील?

उत्तर = 72/8 = 9 वर्षे

  • तुमचे 20,000 रुपये किती दिवसात 12% वार्षिक परताव्याने दुप्पट होतील?

उत्तर = 72/12 = 6 वर्षे

  • तुमचे 50,000 रुपये किती दिवसात 16% वार्षिक परताव्याने दुप्पट होतील?

उत्तर = 72/16 = 4 वर्षे 5 महिने

  • तुमचे 15,000 रुपये किती दिवसात 20% वार्षिक परताव्याने दुप्पट होतील?

उत्तर = 72/20 =   3 वर्षे 6 महिने

  • तुमचे  35,000 रुपये किती दिवसात 24% वार्षिक परताव्याने दुप्पट होतील?

उत्तर = 72/24 =   3 वर्षे

rule-of-72-formula

आपल्याला 72 सूत्राचा नियम(Rule of 72 Formula) याची वरील सर्व उदाहरणे नक्कीच समजली असतील. आपले पैसे किती दिवसांत दुप्पट होतील हे आपल्याला किती सहज माहिती होईल. त्याप्रमाणे आपण आपली गुंतवणूक करू शकतो.

सूचना: गुंतवणूक करण्यापूर्वी सल्लागाराचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे अथवा आपण स्वतः करत असल्यास आपणास गुंतवणूकचे पूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे.

तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्द्ल तुमचा अभिप्राय कळवा. लवकरच भेटू!
नवीन विषय! नवीन लेख! फक्त आपल्या मराठी मातृभाषेत!
सारा इन्वेस्ट्मेन्ट्स
सुहास जोगळे

Categories: Investment

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *