Systematic Investment Plan – पद्धतशीर गुंतवणूक योजना
Systematic Investment Plan चा आपण मराठी मध्ये शब्दशः अर्थ पहिला तर असा होतो की “पद्धतशीर गुंतवणूक योजना” एसआयपी(SIP) ला सिप हि म्हटलं जातं. एसआयपी म्हणजे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी अनेक म्युच्युअल फंडाद्वारे दिला जाणारा गुंतवणुकीचा एक मार्ग किंवा पर्याय होय.
मराठीमध्ये एक म्हण आहे “थेंबे-थेंबे तळे साचे” त्याच प्रमाणे एसआयपी च्याद्वारे थोडी-थोडी रक्कम जर आपण बाजूला काढली तर खूप वर्षांनी त्या लहान रक्कमेचं मोठ्या रक्कमेत रुपांतर झालेलं असतं. म्हणून एसआयपी हा एक उत्तम पर्याय आहे.
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन/एसआयपी/सिप(Systematic Investment Plan)
1. ठराविक रक्कम विशिष्ट आर्थिक हेतूसाठी म्युच्युअल फंडात एसआयपीने गुंतवणे होय. एसआयपीद्वारे गुंतवणूकदार कमीत-कमी 100 रुपयापासून गुंतवणूक करू शकतो.
जरी ती रक्कम लहान असेल तरी त्यावर चक्रवाढ व्याजाचा (Power of Compounding) फायदा घेता येतो म्हणून सर्वानां एसआयपी हा पर्याय खूप सोयीस्कर आहे.
2. तुमच्या बँक खात्यातून ठरवलेली रक्कम, ठराविक दिवशी, मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक, वार्षिक या कालावधीत आपण ठरवलेली रक्कम एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतविली जाते.
3. निश्चित कालावधी म्हणजे एसआयपीसाठी काही निश्चित काळ हा ठरवावाच लागतो. जसं की 6 महिने, 1,2,3,4,5,10,15,20…वर्ष अशा प्रकारे मुदत ठरवावी लागते.
एसआयपी सुरु केल्यावर निश्चित केलेल्या काळानंतर एसआयपी बंद होते.
उदा. समजा आपण एक एसआयपी 1 जानेवारी 2020 पासून सुरु केली आणि त्याचा कालावधी 5 वर्षाचा निश्चित केला. तर ती 1 जानेवारी 2024 नंतर पूर्ण होईल त्यानंतर ती एसआयपी आपोआपच बंद होईल.
4. एसआयपी केव्हाही बंद करता येते यासाठी ही सोय उपलब्ध आहे.
उदा. ज्यावेळेस आपत्कालीन परिस्थिती(नोकरी गमावणे, वैद्यकीय संकट इत्यादी) ओढवते तेव्हा एसआयपी बंद करून तो निधी वापरू शकतो.
गुंतवणूकदारांचे पैसे बाजाराच्या तेजी(Market Rise) किंवा मंदीमध्ये(Market down) सुद्धा गुंतवले जातात. त्यामुळे रुपयाची सरासरी किंमतिचा(Rupee Cost Averaging) फायदा घेऊ शकतो.
5. एसआयपी दीर्घकालावधी उद्धिष्टांसाठी केल्यास केव्हाही चांगली जसे की मुलांचे उच्च शिक्षण आणि त्यांची लग्न, आपली निवृत्ती इत्यादी.
दीर्घकाळ उद्धिष्टे ही 5 ते 7 वर्ष्यांच्या पुढे असावीत.
सूचना: म्युच्युअल फंडाद्वारे एसआयपीच्या मार्गाने गुंतवणूकदारांना गुंतवणुक करायची असल्यास आपल्या गुंतुवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे. अथवा आपण स्वतः करत असल्यास आपणास म्युच्युअल फंडाचे पूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे.
तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्द्ल तुमचा अभिप्राय कळवा.
लवकरच भेटू!नवीन विषय! नवीन लेख! फक्त आपल्या मराठी मातृभाषेत!
सारा इन्वेस्ट्मेन्ट्स
सुहास जोगळे
0 Comments