Categories: Investment

Power of Compounding: चक्रवाढ व्याजाची शक्ती

Power of Compounding: चक्रवाढ व्याजाची शक्ती

मित्रांनो आज आपण चक्रवाढ व्याजाची शक्ती(Power of compounding) बद्दल माहित करून घेणार आहोत. पण तत्पूर्वी सरळव्याज(Simple Interest) म्हणजे काय आहे हेसुद्धा पाहणे तितकेच महत्वाचे आहे म्हणून थोडक्यात सरळव्याजही पाहणार आहोत.

आपण करत असलेल्या बचत(Savings) किंवा गुंतवणूक(Investment) यावर मिळणारे व्याज(Interest) कोण-कोणते असते, किंवा व्याज बचत किंवा गुंतवणुकीत किती महत्वाचे काम करत आहे हे सुद्धा समजून घेणे आजची गरज आहे.

“चक्रवाढव्याज(Compound interest) जगातील आठवं आश्चर्य आहे. जे समजून घेतात, ते कमवतात किंवा मिळवतात, आणि जे समजून घेत नाहीत ते गमावतात.”

महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन(Albert Einstein)

आपण व्याज(Interest) म्हणजे काय ते पाहू: आपल्या पैशाच्या वापरासाठी किंवा पैशावर दिली जाणारी रक्कम म्हणजे व्याज होय. दुसर्यांनी आपल्याला वापरायला दिलेले पैसे आणि त्या पैशाचे भाडे किंवा रेंट म्हणजे व्याज आपल्याला द्यावे लागते.

बँक असो की इतर अर्थपुरवठा(financial institutions) करणाऱ्या संस्था असोत त्या कर्जाच्या रुपात आपल्या ग्राहकांना वापरायला पैसे देतात आणि या पैशाच्या बदल्यात ते ग्राहकांकडून व्याज घेतात. व्याजाची टक्केवारी आधीच निश्चित केलेली असते. उदा. 12% किंवा 14% वार्षिक दर.

व्याज प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

सरळव्याज(Simple Interest)

सरळव्याज म्हणजे एका ठराविक कालावधीत काही विशिष्ट रकमेवर व्याज मिळवणे किंवा भरणे आणि त्याचे अंदाज लावण्याचे एकच सूत्र(Formula) म्हणजे सरळव्याज होय.

सरळव्याजाचे सूत्र(Simple interest Formula):

सरळव्याज = (मुद्दल x दर x मुदत ) / 100
= (10000 x 8 x 2 ) / 100
सरळव्याज = 1600 (10 हजारावर, 2 वर्षाचे सरळव्याज 1600 रुपये होतात.)

एक उदाहरण पाहू:

मुदत(गुंतवणूक कालवधी)व्याज(Interest)रास(Amount)
वर्षे 1800010800
वर्षे 2160011600
वर्षे 3240012400
वर्षे 4320013200
वर्षे 5400014000
वर्षे 6480014800
वर्षे 302400034000
10000 रुपये रक्कमेवर द.सा.द.शे. 8% दराने 30 वर्षे मुदतीचे व्याज

सरळव्याजाचे मुख्य मुद्दे:

  • वरील उदाहरणात असे दिसते की 10000 हजार रुपयाचे 30 वर्षात फक्त 34000 हजार रुपयेच झाले. त्यातून मुद्दल वजा केले असता 24000 हजार रुपये व्याज मिळाला.
  • सरळव्याज मध्ये व्याज निश्चित असते. व्याजदर बदलत नाही, फक्त मुख्य रक्कम बदलते, व्याजाचेप्रमाण बदलते.
  • सरळ व्याजातील मुद्दल प्रत्येक कालावधीसाठी निश्चित ठेवली जाते.
  • सरळव्याज मुदतीवर सुद्धा अवलंबून असते. कर्जाच्या मुख्य भागावर किंवा बचतखात्यातील मुद्दलावर देखील व्याज मोजले जाते.
  • आणि फक्त मुद्दलावरच व्याज मिळवता येते.

चक्रवाढव्याज(Compound interest)

चक्रवाढव्याज(Compound interest) मुख्य रकमेवर आणि मागील कालावधीच्या जमा व्याजांवर देखील मोजले जाते आणि अशा प्रकारे “व्याजवरील व्याज” म्हणून ओळखले जाऊ शकते.

चक्रवाढ व्याजाचे सूत्र(Compound Interest Formula):

रास = मुद्दल(1+व्याजाचे दर)काळA= P(1+r)n

रास – Amount(A)

मुद्दल(म) – Principle Amount(P)

दर(द) – Rate of Returns(R)

काळ(क) – Number of years-Investments period(N)

येथे आपण एका वर्षासाठी गणित केलं आहे, समजा 30 वर्षासाठी एकूण व्याज काढलं तर किती येईल ते आपण खाली उदाहरणातून पाहू.

वर्षेमुद्दल(Principle Amount)वार्षिक व्याज(Year Interest)एकूण व्याज(Total Interest)वर्ष अखेर रास(Balance Amount)
1100001400140011400
2114001596299612996
3129961819481514815
4148152074688914889
5168892364925419254
3044693162570499501509501
10000 हजार रुपये रक्कमेवर द.सा.द.शे. 14% दराने 30 वर्षे मुदतीचे चक्रवाढ व्याज

पहिल्या वर्षाचे(काळाचे) व्याज = 1400

मुद्दलामधे व्याज मिळवून वर्षाच्या शेवटी येणारी रास = 11400

वर्षाच्या शेवटी येणारी रास ही पुढील वर्षाचे(वर्ष दुसरे) मुद्दल असते = 11400

वरील उदाहरणात असे दिसते की 10000 हजार रुपयाचे 30 वर्षात 5.09 लाख रुपये होतात.

त्यातून आपण सुरवातीची मुद्दल रक्कम म्हणजे 10000 वजा केले तरी त्यावर 4.99 लाख फक्त व्याजच मिळालं.

इथे आपण चक्रवाढ व्याजाची ताकद काय असते ते पाहू शकतो.

चक्रवाढ व्याजाचे(Compound interest) मुख्य मुद्दे

  • चक्रवाढ व्याजातील व्याजाची रक्कम बदलते.
  • व्याजदर बदलत नाही, फक्त मुख्य रक्कम बदलते, व्याजाचे प्रमाण बदलते.
  • चक्रवाढ व्याजातील मूळ रक्कम बदलते.
  • चक्रवाढव्याजामध्ये व्याजवर व्याज मिळते.

आपल्याला माहित असेलच क्रेडीट कार्डवर जवळपास 36% वर्षाचा व्याज आहे. क्रेडीटकार्डचा अतीवापर केलातर 36% व्याज भरून आपण आर्थिक दृष्ट्या कमकुवत बनू शकतो.

आणि समजा आपल्या पैशावर 36% व्याज मिळालं तरच आपण किती आर्थिक दृष्ट्या सक्षम बनू हेच लक्ष्यात घेण जरगेच आहे. म्हणूनच आपण चक्रवाढव्याज व्याजाबद्दल जितकं अधिक जाऊन घेऊ, तेवढं आपल्या फायद्याचेच आहे.

कारण “आपल्या पैशांनी आपल्यासाठी काम करायला हवं!” नाहीकि आपण पैशासाठी काम करायला हवं.

आपण म्हणतो कि श्रीमंत इतके श्रीमंत कसे होत आहेत, कारण श्रीमंतांनी चक्रवाढव्याजाचं अभ्यास केलं आहे. आणि त्यांनी चक्रवाढ व्याज मिळवण्याचे मार्ग शोधून काढले आहेत. आणि सामान्य लोक त्याच-त्याच चक्रामध्ये का अडकवून घेत आहेत कोणास ठाऊक?

पण त्यांनी चक्रवाढ व्याजाचे सूत्र समजून घेतलेच पाहिजे.

तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्द्ल तुमचा अभिप्राय कळवा. लवकरच भेटू!
नवीन विषय! नवीन लेख! फक्त आपल्या मराठी मातृभाषेत!
सारा इन्वेस्ट्मेन्ट्स
सुहास जोगळे

SARA Investments

Recent Posts

Mediclaim Insurance Policy for Family – आरोग्य विमा

Mediclaim Insurance Policy - आरोग्य विमा Mediclaim किंवा Health Insurance Policy म्हणजेच काय तर मराठीमध्ये… Read More

10 months ago

The Right Financial Advisor – योग्य आर्थिक सल्लागार

The Right Financial Advisor - योग्य आर्थिक सल्लागार रात्री 8 – 8.30 वाजले असतील, आमची रोजची जेवायची वेळ.… Read More

11 months ago

Liquid Funds – लिक्विड फंड

लिक्विड फंड (Liquid Mutual Funds) लिक्विड फंड हे डेट म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे. सरकारी कोशागार देयके(treasury Bills), सरकारी सेक्युरिटीज,… Read More

11 months ago

Medical Emergency Situation – वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती

Medical Emergency Situation- वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती मित्राने Whats App वर ट्रेकिंग साठी जायचं Location Share… Read More

11 months ago

CORONA and my relative – कोरोना आणि माझा नातेवाईक

CORONA and my relative - कोरोना आणि माझा नातेवाईक मित्रांनो आता तुम्हाला माहीतच आहे, कोरोना(COVID-19)… Read More

11 months ago

Become Self-Reliant – आत्मनिर्भर बना

Become Self-Reliant - आत्मनिर्भर बना! माझा एक मित्र आहे, हितेश त्याचं नाव आहे. तो हि… Read More

11 months ago