Types of Mutual Funds – म्युच्युअल फंड प्रकार
आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय हे अगोदरच्या लेखात पाहिलेले आहे. तरी पण आपण येथे Click करुन पाहु शकता.
म्युच्युअल फंड हे सर्व वर्गातील गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक करण्याचे एक उत्तम साधन आहे. आपल्याला माहित झालं आहेच की पारंपारिक गुंतवणुकीपेक्षा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे किती सोपे आणि किती फायदेशीर आहे.
पण आपल्याला प्रश्न पडतात की पैसे नक्की कुठे गुंतवले पाहिजेत. आणि त्यासाठी म्युच्युअल फंडाच्या अशा कोणत्या योजना असतात. तसेच म्युच्युअल फंड्स कुठे-कुठे पैसे गुंतवतात ते आपल्याला खालील योजंनांवरून माहित करून घ्यायचे आहे.
चालू योजना आणि बंद योजना
आपण चालू योजना(Open Ended Scheme) आणि बंद योजना(Closed Ended Scheme) काय आहेत ते हि पाहिलेल्या आहे. चालू योजनेत गुंतवणूकदराला कधीही खरेदी आणि विक्री करण्याची मुभा असते. म्युच्युअल फंड कंपनीला नवीन युनिट देण्यावर कोणतेही बंधन नसते.
बंद योजनेत नावाप्रमाणेच म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूकीची अंतिम मुदत अगोदरच निश्चित केल्यामुळे म्युच्युअल फंडाचे सर्व युनिट गुंतवणूकदाराकडून नवीन फंड ऑफर द्वारे खरेदी केल्यावर ते नवीन गुंतवणूकदाराला गुंतवणूकीसाठी बंद होतात.
चालू अणि बंद योजनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे Click करा.
1. समभाग योजना(Equity Fund):
या योजनेत प्रामुख्याने शेअर्स बाजारातील सूचीबद्ध असण्याऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये(Stocks आणि Shares) गुंतवणूक करतात.
म्हणून यांना समभाग योजना म्हणतात. त्यांच्याकडे उच्च उत्पन्न मिळण्याची क्षमता असते आणि दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी ते सर्वोत्कृष्ट असतात म्हणून यांना दीर्घ काळामध्ये चांगले रिटर्न देणारे फंड्स म्हणूनही ओळखले जातात. संपत्ती निर्मिती आणि भांडवल वाढ हे यांचे मुख्य उद्दीष्ट असते.
तसेच जोखीम जास्त असते आणि जोखीम जास्त असल्याकारणाने यांचे returns हि जास्त असतात.
यामध्ये पैसे गुंतवताना कमीत-कमी 5 ते 7 वर्षे तरी ह्या पैशांची गरज लागणार नाहीत, हे गृहीत धरून गुंतवणूक करावी.
समभाग योजनेची(Equity Fund) काही उदाहरणे:
1. लार्ज कॅप फंड(Large Cap Fund): हे फंड मोठ्या प्रमाणात व्यवसाय असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
2. मिड कॅप फंड(Mid Cap Fund): हे फंड मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
3. स्मॉल कॅप फंड(Small cap Fund): हे फंड लहान आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
मल्टी-कॅप फंड(Multi Cap Fund): हे फंड मोठ्या, मध्यम आणि लहान कंपन्यांच्या मिश्रणात गुंतवणूक करतात.
4. सेक्टर फंड(Sector Fund) हे फंड अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात, जे एका प्रकारच्या व्यवसायाशी संबंधित असतात.
उदाहरणार्थ, तंत्रज्ञान निधी असे असतात जे केवळ तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
5. थीमॅटिक फंड(Thematic Fund): हे असे आहेत की जे सामायिक थीममध्ये गुंतवणूक करतात. जसे इन्फ्रास्ट्रक्चर सेगमेंटच्या वाढीचा फायदा असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
6. कर बचत फंड (Tax Saving Fund): हे फंड कर बचत करण्यास मदत करतात.
2. बाँड्स किंवा डेब्ट फंड (Bonds or Debt Funds):
हे फंड सरकारी रोखे किंवा बॉन्ड्स(Securities or Bonds), कमर्शियल पेपर किंवा डेबेंचर्स(Commercial Papers and Debentures), बँक ठेवी आणि मनी मार्केट साधनांचे प्रमाणपत्र(Bank Certificates of Deposits and Money Market instruments)
जसे की ट्रेझरी बिल्स(Treasury Bills), कमर्शियल पेपर्स(Commercial Paper) यासारख्या निश्चित उत्पन्न रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात.
ही तुलनेने अधिक सुरक्षित गुंतवणूक असतात आणि उत्पन्न निर्मितीसाठी योग्य असतात.
3. संकरित फंड(Hybrid Funds):
हे हायब्रिड फंड एकापेक्षा जास्त मालमत्ता वर्गात(Asset Class) गुंतवणूक करतात. म्हणजेच समभाग योजना(Equity Fund) आणि डेब्ट फंड (Debt Fund) या दोन्ही फंडांमध्ये गुंतवणूक करतात.
अशा प्रकारे वाढीची क्षमता(Growth Potential) तसेच उत्पन्न निर्मिती(Income Generation )यासाठी हे सर्वोत्कृष्ट आहेत.
हायब्रिड फंडाची काही उदाहरणे:
- आक्रमक संतुलित निधी(Aggressive Balanced Funds)
- कंझर्व्हेटिव्ह समतोल निधी(Conservative Balanced Funds)
- निवृत्तीवेतन योजना(Pension Plans)
- आणि बाल योजना(Child Plans)
- मासिक उत्पन्न योजना(Monthly Income Plans) इत्यादी.
सूचना: म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांना गुंतवणुक करायची असल्यास आपल्या गुंतुवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे अथवा आपण स्वतः करत असल्यास आपणास म्युच्युअल फंडाचे पूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे.
तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्द्ल तुमचा अभिप्राय कळवा.
लवकरच भेटू!नवीन विषय! नवीन लेख! फक्त आपल्या मराठी मातृभाषेत!
सारा इन्वेस्ट्मेन्ट्स
सुहास जोगळे
0 Comments