Child Education Cost- बाल शिक्षण नियोजन खर्च

आपण गुंतवणूक करत असताना आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या गरजा भागविण्यासाठी एखादी योजना तयार आहे का? जर अजूनपर्यत योजना तयार नसेल, तर कृपया तयार करायला घ्या! आपल्या मुलाचं शिक्षण आजकाल खरच स्वस्त आहे का? तर माझं उत्तर आहे “नाही” भारतात शिक्षणासाठी लागणारी किंमत वेगाने वाढत आहे.

प्रिस्कूल(Preschool), प्राथमिक(Primary) ते माध्यमिक(High school) ते उच्च शिक्षणापर्यंत(Higher Education) वाढते शुल्क(fee) रचना आणि शैक्षणिक संबधित इतर खर्च भागविणे पालकांना अधिक कठीण होत आहे. कारण शिक्षणावरील खर्च सर्वसाधारण दरापेक्षा वाढत चाललेला आहे. आज पालक जरी चांगले पैसे कमावत असो किंवा नसो, चांगल्या शाळा, महाविद्यालय, शोधत असतात आहेत, कारण एकच! मुलांना चांगलं शिक्षण द्यायला हवं.

आजकाळ मुलांना वयाच्या 2 ऱ्या वर्षापासून शाळेत जायला सुरवात झाली आहे. जसं की Play-Group, बालविहार(kindergarten). Play-Group, बालविहार ची वर्षाची फी किती आहे माहीत आहे का? जवळपास 15 हजार ते 1 लाख रुपये किंवा त्याहीपेक्षा असू शकतो, आणि हो ते ही तुमच्या राहत्या ठिकाणानुसार(area-wise)शुल्क असते.

काही नामांकित संस्थांकडून शिक्षणाचा वरील खर्च दर्शविला जाऊ शकतो. आपण बाल विहार, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण बघत आहोत. पण समजा उच्चशिक्षण करायचं असेल, जसं की इंजीनियरिंग(Engineering), मेडिकल(Medical) एमबीए(MBA) इत्यादी साठी किती खर्च येईल हे आपल्याला पाहावं लागेल.

महत्वाचा मुद्दा काय तर आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी किती खर्च येईल याचा अंदाज घेऊन त्यासाठी आता आपल्याला काय करावे लागेल? यावरही विचार करणं खूप गरजेचं आहे आपल्या मुलांचे भविष्य आपल्याच हातात आहे.

राष्ट्रीय नमूना सर्वेक्षण कार्यालय(NSSO) च्या मते 2008 ते 2014 या कालावधीत सर्वसाधारण शिक्षणासाठी(प्राथमिक ते पदवी आणि पुढील) शिक्षणासाठी जवळपास 175% वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणात 96% वाढ झाली. यावाढीव खर्चात सामन्यात: कोर्स फी, पुस्तके, वाहतूक, प्रशिक्षण आणि इतर खर्च समाविष्ट असतात.

शिक्षण हे जीवनाची तयारी नसते, शिक्षण म्हणजे जीवन असते

जॉन डिवी

भविष्यात तुमच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी(Child Education) तुम्हाला किती खर्च येईल? हे आपल्याला तपासून पहावे लागेल.

आज 2019 मध्ये उच्च शिक्षणासाठी(Higher education)किती खर्च येतो, ते अगोदर पाहू!

एम.बी.ए.(MBA)शिक्षण : 17.42 लाख

अभियांत्रिकी(Engineering)) शिक्षण: 10 लाख

वैद्यकीय(Medical) शिक्षण: 50 लाख

आय.आय.एम.(IIM), आय.आय.टी.(IIT) यांसारख्या नामांकित संस्थांकडून शिक्षणाचा वरील खर्च दर्शविला जातो.

2034 मध्ये उच्च शिक्षणासाठी(Higher Education)इतका खर्च येईल.

एम.बी.ए.(MBA)शिक्षण: 72.76 लाख

अभियांत्रिकी (Engineering)शिक्षण: 41.77 लाख

वैद्यकीय (Medical)शिक्षण: 2.08 कोटी

आपण आज रोजी 2019 ते 2034 अशा एकूण 15 वर्षाच्या कालावधीत आपण 10% महागाई गृहीत धरली आहे. त्याप्रमाणे एम.बी.ए., अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा शिक्षणासाठी किती किंमत मोजावी लागणार आहे हे पाहिलेले आहे.

आपण एक उदाहरण बघू:

आज डिसेंबर 2019 रोजी साराचे वय 4 वर्षे आहे:

वय 18 व्या वर्षी अभियांत्रिकी शिक्षण आणि 21 व्या वर्षी एम.बी.ए. सुरु होईल.

उच्च शिक्षण म्हणजे अभियांत्रिकी शिक्षणासाठी आज 10 लाख रुपये आणि एम.बी.ए. साठी 17.42 लाख रुपये पाहिजेत.

परंतु अभियांत्रिकी शिक्षणासाठी अजून 14 वर्षे आहेत. आणि एम.बी.ए. 17 वर्षे आहेत.

समजा आपण गुंतवणूक करत आहात त्या गुंतवणुकीतून तुम्हाला 12% वार्षिक परतावा मिळत आहे.

तर अभियांत्रिकी शिक्षणासाठी दरमहा 9100 रुपये तुम्हाला गुंतवावे लागतील.

आणि एम.बी.ए. शिक्षणासाठी दरमहा 14100 रुपये लागतील.

महत्वाच्या टिपा:

1. कालावधी निश्चित करा(Define duration):

गुंतवणूकीसाठी वेळ हा सर्वात महत्वाचा घटक असतो. आपल्या मुलाचे सद्याचे वय आणि ते ज्या वयात उच्च शिक्षण घेतील त्यानुसार बचत किंवा गुंतवणुकीसाठी वेळ द्यावा.

2. शिक्षणासाठी साधारण किती खर्च येईल याचा शोध घेणे(how much it will cost to education):

शिक्षणाची सध्याची किंमत समजून घेणे, पण आपण कोठे राहता यावर अवलंबून आहे. शिवाय शिक्षणाचा स्तर हे ही महत्वाचे आहे. तसेच, तुमचे मूल देशात किंवा परदेशात पदवीधर, आणि पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी शिक्षण घेईल की ते खासगी संस्थांकडून असेल की नाही हेदेखील निश्चित करा.

3. वाढत्या महागाईचा विचार करा(Consider rising inflation):

इतर सेवा आणि वस्तूच्या बरोबर शिक्षणाच्या खर्चातही वाढ होते. तेव्हा वाढत्या महगाईचा विचार केलाच पाहिजे.

4. परतावा दर निवडा(Choose rate of return):

आपल्या गुंतवणूकीवर वाजवी दर निश्चित करणे महत्वाचे आहे. आपण निवडलेला परतावा दर महागाईच्या दरापेक्षा जास्त असावा. उदाहरणार्थ, आपण आपल्या बँकेच्या स्थिर ठेव दरापेक्षा जरा जास्त परताव्याच्या दराची अपेक्षा करू शकता. जोखीम समजून गुंतवणूक करावी.

5. मासिक बचतीची गणना करा(Calculate monthly savings):

अपेक्षित परतावा आणि अंतिम आर्थिक ध्येय लक्ष्यात घेऊन, त्याप्रमाणे आपण मासिक बचत करावी आपल्याला मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक निधी किती लागेल हे पाहण्यासाठी आपण ऑनलाइन कॅल्क्युलेटरची मदत घेऊ शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्द्ल तुमचा अभिप्राय कळवा. लवकरच भेटू!
नवीन विषय! नवीन लेख! फक्त आपल्या मराठी मातृभाषेत!
सारा इन्वेस्ट्मेन्ट्स
सुहास जोगळे


0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *