Benefits of Systematic Investment Plan – सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचे फायदे
एसआयपी(SIP) म्हणजे काय हे आपल्याला ठाऊक आहे. आपण ठरवलेल्या म्युच्युअल फंड योजनेमध्ये नियमित रकमेची गुंतवणूक करणे होय.
एसआयपीमध्ये दरमहा तुमच्या बचत खात्यातून एक निश्चित रक्कम नियमितपणे कपात केली जाते. आणि आपण निवडलेल्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली जाते.
जसं की जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा नियमित व्यायाम आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो.
पद्धतशीर गुंतवणूक योजनाचे काही फायदे खालीलप्रमाणे:
1. एसआयपी बचतीची सवय किंवा सुविधा(Convenient for savings):
आपण दैनंदिन जीवनात काहीना काही खर्च हे करतच असतो. पण त्यामुळे कोणत्याही प्रकारची बचत करणे बर्याच लोकांना जमत नाही. अशा परिस्थितीत शिस्तबद्ध आणि टप्प्याटप्प्याने एसआयपीच्या(SIP) माध्यमातून गुंतवणूक करणे हि या दिशेने एक चांगली संधी असू शकते.
एसआयपी हा असा एक पर्याय आहे की हे आपल्याला बचत करण्याची आणि गुंतवनुकीची सवय लावते. यामुळे नियमितपणे काही पैसे वाचविण्यास गुंतवणूकदारांना शिस्त लागते. शिवाय आपण SIP मध्ये कमीतकमी 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतो.
2. रुपया किंमतीची सरासरी(Rupee Cost Averaging):
आपल्याला हे माहित असेलच की शेअर्स बाजारात चढ(Market Rise)-उतार(Market Fall) असतोच. पण बाजारातील वेळ समजायला बर्याच जणांना कठीण जाते. परंतु आपण जेव्हा एसआयपीमध्ये गुंतवणूक करता तेव्हा बाजार कोठे जात आहे याची आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही.
खाली दिलेल्या तक्त्यात पाहू शकता.

कारण बाजारात तेजी किंवा मंदी असो अशा परिस्थितीत आपल्या नियमित गुंतवणूकीमुळे दीर्घ कालावधीत अधिक युनिट्स खरेदी होत असतात.
आणि परिणामी तुमचा प्रति युनिट खर्चही कमी होत असतो. त्यामुळे चांगला परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते.
3. चक्रवाढ व्याजाची शक्ती(Power of Compounding):
चक्रवाढ व्याज म्हणजे नियमित रकमेमध्ये वर्षाकाठी नियमित वाढीसाठी त्याच दराने मिळणार्या पुनर्गुंतवणुकीचा संदर्भ होय. जेव्हा आपण म्युच्युअल फंडाची गुंतवणूक करतो, तेव्हा चक्रवाढ व्याज आपल्याला आपल्या मुद्दलवर( व्याज मिळवून देते.
उदाहरणार्थ: श्री. अ यांना एक मुलगा झाला. श्रीयुत अ नी त्यांच्या मुलाच्या जन्मदिवसापासूनच मुलाच्या नावाने फक्त एक रकमी 50,000 हजार रुपये म्युच्युअल फंडात गुंतवले तर त्याच मुलाच्या वयाच्या 40, 50 आणि 60 वर्षा पर्यत किती रक्कम झालेली असेल ते आपण पाहू.
एक रकमी 50,000 हजार रुपये गुंतवले.
आणि 14% वार्षिक चक्रवाढ व्याज गृहीत धरूया.
तर त्या मुलाच्या वयाच्या 40 व्या वर्षी, ती रक्कम 94.44 लाख होईल.
आणि तीच रक्कम अजून 10 वर्षापर्यत(वयाच्या 50 व्या वर्षी) ठेवली तर 3.50 कोटी होतील.
तसेच त्याच्या वयाच्या 60 व्या वर्षापर्यत(म्हणजे मुलाच्या निवृत्ती वयापर्यंत) ठेवली तर 12.97 कोटी होतील.
उदाहरणात दिल्याप्रमाणे आपण बघू शकतो की चक्रवाढ व्याजाची करामत.
आपली आर्थिक उद्दिष्टे(Our Financial Goals):
आपण व्यवस्थितपणे अशा प्रकरच्या गुंतवणूक करता तेव्हा आपली संपत्ती वाढत असताना आपण पाहू शकता. आपण जे-जे स्वप्न पाहत असता, जसं की मोठी कार खरेदी करणे, परदेशी सुट्टीचे स्वप्न, अलिशान घर, मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवणे आणि आपली निवृत्ती अशी काहीना काही आर्थिक मोठी स्वप्न असतातच. अशा दीर्घकाळन ध्येयासाठी आपण प्रत्येक आर्थिक ध्येयासाठी आपल्याला काही रक्कम नियमितपणे बाजूला ठेवावी लागेल, तेव्हाच आपली स्वप्ने किंवा ध्येयापर्यंत आपण सहज पोहचू शकतो.
म्हणून Systematic Investment Plan(SIP) हा एक सर्वांना गुंतवणुकीसाठी खूप चांगला पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूक करताना योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे.
सूचना: म्युच्युअल फंडाद्वारे एसआयपीच्या मार्गाने गुंतवणूकदारांना गुंतवणुक करायची असल्यास आपल्या गुंतुवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे अथवा आपण स्वतः करत असल्यास आपणास म्युच्युअल फंडाचे पूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे.
तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्द्ल तुमचा अभिप्राय कळवा.
लवकरच भेटू!नवीन विषय! नवीन लेख! फक्त आपल्या मराठी मातृभाषेत!
सारा इन्वेस्ट्मेन्ट्स
सुहास जोगळे
0 Comments