Benefits of Mutual Fundsम्युच्युअल फंडाचे फायदे

आज बरेच लोक शेअर्स बाजारात पैसे गुंतवणूकीस तयार असतात. पण शेअर्स बाजाराचे अपुरे ज्ञान आणि वेळ त्यांच्याकडे नाही, पण शेअर्स बाजाराव्यतिरिक्त अजुन असा एक पर्याय आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड.

कारणआपल्याकडे असलेले कमी पैसे आणि भारतातील सर्वात चांगल्या कंपन्यामध्ये गुंतवणूक करायची असल्यास आपण म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतो.

म्युच्युअल फंडाचे कोण-कोणते फायदे आहेत ते पाहूया:

1. ठराविक रक्कम मग तो कोणीही गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी(Systematic Investments Plan) च्या माध्यमातून कमीतकमी 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकतो.

2. आपण ऐकलं असेलच की अमुक कंपनीचे शेअर्स खूप महाग आहेत आणि ते शेअर्स आपल्याला घेणे शक्य नसते पण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे ते शक्य आहे.

काही भारतातील महाग असलेले शेअर्स(प्रती शेअर्स किंमत):

एमआरएफ(MRF)-62000, हनीवेल ऑटोमेशन(Honeywell Automation) – 27000, आयशर मोटर(Eicher Motors) – 21000 इत्यादी. म्हणूनच म्युच्युअल फंड हा खूप चांगल पर्याय आहे.

3. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदाराला फार कमी खर्च करावा लागतो त्याचप्रमाणे आपण कुशल तज्ञांकडून त्यांचे फायदे ही घेऊ शकतो.

आणि हा खर्च 2.5% पेक्षा जास्त नसतो. यालाच खर्च प्रमाण(Expense Ration) म्हणतात.

4. म्युच्युअल फंडात तरलता असल्यामुळे आपण गुंतवलेले पैसे आपल्याला गरज असेल तेव्हा काढून घेऊ शकतो.

5. म्युच्युअल फंड(Mutual Funds) जो फंड जमा करतात आणि तो कोण कोणत्या कंपन्यांच्या स्टॉक्स किंवा शेअर्स मध्ये गुंतवतात याची काळजी करण्याची आपल्याला गरज नसते.

कारण त्यासाठी तंज्ञ फंड अधिकारी(Fund Manager) असतात. कारण यांना याची पूर्ण माहिती असते. आणि ते योग्य पद्धतीने यांचे व्यवस्थापन करतात त्यामुळे गुंतवणूक सुरक्षित होण्यास मदत होते.

6. म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार कोणीही असो, सर्वांना समान NAV मध्ये युनिट्स दिले जातात. त्यामुळे म्युच्युअल फंडात पारदर्शकता येते.

7. म्युच्युअल फंड हे सेबी(SEBI) म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या गव्हर्मेंट बॉडी कडून नियंत्रित केले जातात.

8. जेव्हा आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असतो तेव्हा आपण आपल्या देश्याच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावत असतो. आणि देशातील उद्योग धंदे वाढले तर आपलीही आर्थिक प्रगती होऊ शकते.

म्युच्युअल फंडाचे फायदे(Benefits of Mutual Funds) समजून घेतल्यावर नक्कीच आपला गुंतवणूक करण्याचा मार्ग सोयीस्कर होईल.

सूचना: म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांना गुंतवणुक करायची असल्यास आपल्या गुंतुवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे अथवा आपण स्वतः करत असल्यास आपणास म्युच्युअल फंडाचे पूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे.

तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्द्ल तुमचा अभिप्राय कळवा.
लवकरच भेटू!नवीन विषय! नवीन लेख! फक्त आपल्या मराठी मातृभाषेत!
सारा इन्वेस्ट्मेन्ट्स
सुहास जोगळे

Categories: Mutual Funds

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *