50 30 20 budget rule – अर्थसंकल्प नियम

मित्रांनो तुम्हाला अमेरिकन प्रसिद्ध हिप-हॉप गायक 50 सेंट(50 cent – Popular hip-hop singer) हे नाव माहित असेलच. तो मिलियनेयर होता. पण त्याच्या एकूण संपत्तीपैकी अर्धी संपत्ती 2015 मध्ये कर्जाच्या दिवाळखोरीत जाहीर केली. असं कश्यामुळे झालं असेल, तर वाईट गुंतवणूक आणि एक मोठा खटला.

म्हणजेच काय तुमच्या पैशाचे योग्य नियोजन नसेल तर तुम्ही कितीही पैसे कमवा, पैसे तुमच्याकडे ज्या वेगाने येतील, त्याच वेगाने जातीलही. लोकांकडे जरा-जास्तच पैसे येतात तेव्हा त्यांची जीवनशैली खूपच बदलते, त्यावेळी त्यांना भान हि राहत नाही. कारण त्यांना उच्च जीवनशैली राखणे महत्वाचे वाटते.

जर 50 30 20 हा सोपा अर्थसंकल्प 50 सेंटला समजला असता तर कदाचित कर्जाच्या दिवाळखोरीतून तो वाचला असता.

अर्थसंकल्प नियमाबद्दल समजून घेऊ…

पण आपण या 50/30/20 अर्थसंकल्पाचा नियम जर समजून घेतला, तर आपले मासिक आर्थिक(Monthly Expenses) नियोजणासाठी मदत होईल, त्याचप्रमाणे अल्पकाळ(Short Term) आणि दीर्घकाळ(Long Term)आर्थिक उद्दीष्टांसाठी(Goals) या अर्थसंकल्पाची मदत होईल

कधी-कधी आपण इतके मोठे खर्च करतो की आपण आपली आर्थिक क्षमताहि पार करतो. मग विचार करण्याची वेळे येते, तेव्हा जास्त खर्च तर केला नाही ना असे प्रश्न पडायला लागतात. आणि हो कर्ज म्हटलं तर आजकाळ लोकांना काहीही वाटत नाही.

कारण मोठ खर घ्यायचं आहे, घर बांधायचं आहे, नवीन गाडी, नवीन TV सेट, मोबाईल इत्यादी अशा प्रत्येकासाठी आपण कर्ज घेतो, आणि हा कर्जाचा डोंगर इतका मोठा होतो की पगार झाल्या-झाल्या एकही रुपया खात्यात शिल्लक राहत नाही, सर्व कर्जाचे हप्ते भरण्यात पैसे जातात.

आणि तेव्हा वाटत राहत की आपण आर्थिक चक्रात किंवा संकटात अडकून गेलो आहोत असं होऊन जातं. तर अशी वेळ कोणावर येता कामा नये. परंतु या 50/30/20 नियमाने आपल्या सर्व आर्थिक परिस्थितीवर मात करता येईल.

यासाठी आपल्याला काय करायचं आहे…

तर मित्रांनो आपण आपल्या जीवनात आर्थिक दृष्ट्या सक्षम बनायचं असेल तर 50/30/20 या नियमाबद्दल अधिक माहीत करून घेणे अनिवार्य आहे. यासाठी आपल्याला पैसे बचत करणे ही सवय लागणे गरजेचे आहे. त्यामुळे काय होईल की आपल्याला वायफळ खर्च करण्याच्या सवयींवर पायबंद करता येईल.

त्याचबरोबर बचत केलेल्या पैशांनी आपल्यासाठी काम करायला पाहिजे असे काही मार्ग आहेत का ते हे समजून घेतले पाहिजेत. गुंतवणूक हे एक असे माध्यम आहे. गुंतवणूक ही वेगवेगळ्या प्रकारची असते आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि ज्ञान असेल तर गुंतवणुकीचा पुरेपूर वापर आपण आपल्या जीवनात करून आपले आर्थिक जीवनमान सुधारू शकतो.

50 30 20 नियम पाहत असताना तुमच्या मनात काही प्रश्न येतील!

जसे की…

आपल्याकडे खूप पैसे असायला हवेत?

उद्योग करायला हवा?

नोकरी चांगली हवी, शिवाय मोठा पगार हवा आहे?

जर माझ्याकडे पैसे आले किंवा मी पैसे जमवले तर याचा विचार करेन?

पण 50/30/20 नियम लक्षात घेता वरील पडलेल्या प्रश्नांना बाजूला ठेऊन, हा नियम आपल्या दैनदिन जीवनात वापरायला सुरुवात करा.

50/30/20/ नियम काय आहे:

“आपले उत्पन्न आपल्या गरजा, चैनीच्या वस्तू आणि बचत यांच्यात कसे विभाजित केले जावे, यावर हा नियम काम करतो.”

थोडक्यात 50/30/20/ नियम हा 100% पैकी तीन भागात विभागले गेले आहे. म्हणजे उद्योग किंवा नोकरी मधून जे महिन्याला उत्पन्न मिळते, त्या उत्पन्नाचे तीन भाग होतात.

हे तीन भाग खालीलप्रमाणे:
50% आपल्या दैनदिन जीवनातील मूलभूत गरजा (Basic Needs)भागवण्यासाठी हा भागघर खर्च, किराणा सामान, पेट्रोल, हॉटेल जेवण, करमणूक खर्च, बिले(वीज, पाणी, गॅस, फोन, इंटरनेट) इत्यादी.
30% दीर्घकाळ मुदत(Long Term)बचत आणि गुंतवणुक इत्यादीसाठी हा भागमुलांचे उच्च शिक्षण आणि लग्न, नवीन घर घेणे, आपली निवृत्ती इत्यादी.
20% अल्प मुदत निधी(Short Term)बदलणारे खर्च आणि आकस्मित निधी किंवा वस्तू आणि सेवा इत्यादीसाठी हा भागनवीन कार,  सहली,  नवीन इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, महागडे कपडे, आकस्मित निधी इत्यादी.
50 30 20 budget rule – अर्थसंकल्प नियम

उदा. समजा तुम्ही एक नोकरी करत आहात आणि तुमचा महिन्याला पगार आहे 15000 हजार रुपये. तर त्या पगारचे म्हणजेच 15000 हजार रुपयाचे तीन भाग केले जातात. एक भाग 50%, दुसरा भाग 30% आणि तिसरा भाग 20% अशी विभागणी केली जाते.

50%30%20%
750045003000
मासिक उत्पन्न(Monthly Net Income)= 15,000
वरील तक्त्यात दिल्याप्रमाणे 15000 हजार रुपये मासिक उत्पन्नाची विभागणी केली आहे.

50% प्रमाणे महिन्याचे 7500 आणि वर्षाचे एकूण 90000 हजार रुपये खर्च करतो.

30% प्रमाणे महिन्याचे 4500 आणि वर्षाचे एकूण 54000 हजार रुपयाची बचत किंवा गुंतवणूक केली.

20% प्रमाणे महिन्याचे 3000 आणि वर्षाचे एकूण 36000 हजार रुपयाची बचत किंवा गुंतवणूक केली.

आपण 15,000 हजार रुपये प्रमाणे वर दिलेले गणित केलेले आहे. महिन्याचा उत्पन्न कोणाचा कमी, तर कोणाचा जास्त असतो. त्यापद्धतीने तुमचा कॉर्पस(कॉर्पस) वाढत असतो. नोकरी करत असलेल्या व्यक्तीचा पगार त्याच्या अनुभवानुसार वाढत असतो. समजा एका व्यक्तीचा पगार दर महिना 50,000 हजार रुपये असेल तर वरील टक्केवारी नुसार रक्कम बदलेल.

50% – 25,000( वार्षिक रक्कम = 3,00,000 लाख रुपये )

30% – 15,000( वार्षिक रक्कम = 1 लाख 80,000 हजार रुपये)

20% – 10,000 (वार्षिक रक्कम = 1 लाख 20,000 हजार रुपये)

जर आपण या अर्थसंकल्प(50 30 20 budget rule) नियमाचा वापर आपल्या दैनदिन जीवनात केलात, तर नक्कीच आपली आर्थिक परिस्थिती अधिक चांगली होईल.

तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्द्ल तुमचा अभिप्राय कळवा. लवकरच भेटू!
नवीन विषय! नवीन लेख! फक्त आपल्या मराठी मातृभाषेत!
सारा इन्वेस्ट्मेन्ट्स
सुहास जोगळे

Categories: Investment

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *