What is Investment and Savings? 

आज आपण गुंतवणूक (Investment) आणि बचत (Savings) म्हणजे काय? ते बघणार आहोत.

आजकाळ आपण हे दोन शब्द अनेक ठिकाणी वाचलेले किंवा ऐकलेले असतील. गुंतवणूक (Investment) आणि बचत (Savings) या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. पण आपण त्यांना एकच समजून बसतो. गुंतवणूक हि एक प्रक्रिया असून तिचे आर्थिक जीवनात एक विशिष्ट स्थान आहे. पण आपण नेहमी या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो किंवा गैरसमज करून बसतो,  कारण आपण अपूर्ण माहिती ऐकलेली वा वाचलेली असते. तरी या दोन्ही गोष्टीतील फरक समजून घेऊ.

आता आपण सर्वप्रथम गुंतवणूक (Investment) म्हणजे काय ते थोडसं समजून घेऊ:
  1.  गुंतवणूक करणे म्हणजे जुगार-मटका खेळणे नाही. शिवाय तो नशिबाचा हि खेळ नाही.  मग नेमकं आहे तरी काय? योग्य मार्गदर्शनाने आणि योग्य मार्गाने पैशांची गुंतवणूक करणे होय! तुम्ही काम  न करता, गुंतवणुकीत तुमच्या पैश्यांनी तुमच्यासाठी काम करायला हवे आहे. याचे धोरण आणि गुणवत्ता या आधारावर हि प्रक्रिया अवलंबून असते.
  2. हा! तुम्हाला वाटेल कि गुंतवणुकीत धोका आहे, जर तुम्ही तसं ठरवलंच असेल तर तुम्हाला तसचं वाटत राहील आणि जर का तुम्ही त्यातील काही प्रमाणात धोके आणि अनिश्चितता accept केलीत तर यातून फायदा सुद्धा मिळू शकतो. तुम्हाला गुंतवणुकीमध्ये धोका कमी करायचा असेल तर नेहमी जागरूक राहावं लागेल.
  3. योग्य गुंतवणूक आणि मार्गदर्शन मिळाले तर तुम्ही तुमचे पैसे वाढवू शकता. होय पण तुम्हाला इथे मी सांगू इच्छितो कि हा काही झटपट श्रीमंत होण्याचा राजमार्ग वगैरे नाही हा! कारण हा तसा काही फोर्मुला नाही.
  4. श्रीमंत वा गरीब असो गुंतवणूक कोणालाही करता येते. चलन वाढ/फुगवता याचा परिणाम तर सर्वांवरच होत असतो, मग तो कोणत्याही ठिकाणी असो.  म्हणून गुंतवणूक हा एक खूप चांगला पर्याय आहे.
आता आपण बचत(Savings) म्हणजे काय ते थोडं समजून घेऊ:

आपण गुंतवणूक म्हणजे काय ते पहिलं, पण गुंतवणूक करण्याआधी आपल्याला बचत करण खूप गरजेचं आहे शिवाय खूप महत्वाचं देखील आहे. आपल्याला भविष्यात आवश्यकता वाटणाऱ्या पैशाची गरज आणि असे पैसे जे आपल्या उत्पनातून आपण थोडे-थोडे करून बाजूला काढणे म्हणजेच बचत होय. आपल्या महिन्याच्या उत्पनातून, मासिक खर्च वजा करून बाजूला काढलेली रक्कम बचत असू शकते. बचत केलेले पैसे आपण केव्हाही वापरू शकतो. बचत Piggy बँक, बँकेत इत्यादी ठिकाणी ठेऊ शकतो. त्याचा व्याज दर हि खूप कमी असतो. जसे कि एखद्या बँकेत तुमचे खाते ( Savings Account) असेल, तिथे तुम्ही त्या खात्यात पैसे ठेऊ शकता.

बचत आणि गुंतवणूक(Investment and Savings) यातील फरक समजून घेऊ:
  1. विशिष्ट आर्थिक उद्धिष्टासाठी आणि पैशांच्या वाढीसाठी केलेली गुंतवणूक ही एका ठराविक मुदतीसाठी Shares, मुच्युल फंड, FD इत्यादी ठिकाणी बंदिस्त असते.
  2. बचतीमधून केव्हाही पैसे काढता येतात, पण गुंतवणुकीतून एका ठराविक काळमर्यादे पर्यत पैसे काढता येत नाहीत.
  3. गुंतवणुकीत धोके असतात पण ते कमी हि करता येतात.
  4. गुंतवणुकीच्या मोबदल्यात तुम्हाला व्याज(Interest), लाभांश(Dividend), बोनस किंवा नफा(Profit) मिळतो.
  5. आजकाळच्या वाढत्या महागाई वर गुंतवणुकीच्या माध्यमाने आपण मात करू शकतो.

तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्द्ल तुमचा अभिप्राय कळवा. लवकरच भेटू!
नवीन विषय! नवीन लेख! फक्त आपल्या मराठी मातृभाषेत!
सारा इन्वेस्ट्मेन्ट्स
सुहास जोगळे

Categories: Investment

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *