What is Financial Freedom? आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय?

आर्थिक स्वतंत्रता(Financial freedom) याबद्दल तुम्ही खूप ऐकलं किंवा वाचलं असेल की आर्थिक स्वतंत्रता म्हणजे लखपती, करोडपती असणं.

त्या व्यक्तीकडे कार, घर, अत्याधुनिक साधने, चैनीच्या वस्तू, दागदागिने, इत्यादी सुखसोयी असतील असे आपल्याला वाटते.

पण हे खरंच सत्य आहे का? मला तर असं वाटतं नाही! मग याचं खरं कारण काय असेल? तर ते पुढील प्रमाणे…

आपल्या कुटुंबाचा  राहण्याचा खर्च(Living Expenses) जसं  की मासिक खर्च(Household Expenses)आणि इतर खर्च धरून जे काही खर्च असतात ते कोणतेही काम न करता तुम्ही कमवू शकत असाल तर तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं (Financial Free) आहे असं आपण म्हणू शकतो.

आता आपण एक उदाहरण बघूया:

  • तुमच्या कुटुंबाचा  वार्षिक खर्च रुपये 3 लाख आहे.
  • तसेच तुम्ही दरवर्षी एका ट्रिपला जात असाल तर त्याचा खर्च रुपये 80 हजार आहे.
  • आणि आपण वर्षात काही असे खर्च करतो, जसे  की नवीन टीव्ही(TV) घेणे, नवीन टू व्हीलर, वॉशिंग मशीन किंवा रेफ्रिजरेटर घेणे किंवा सणासुदीला कपडे, दागिने यांची खरेदी करणे असे एकूण खर्च रुपये १ लाख आहे असे समजू.

असे सर्व खर्च मिळून आपली एकूण पैशांची गरज आहे ४ लाख ८० हजार रुपये (४,८०,०००)वर्षाला. म्हणजेच आपल्याला दर महिन्याला ४० हजार रुपयांची गरज आहे.  तर आपण पाहिलेल्या उदाहरणात ४० हजार रुपये काम न करता दर महिना कमवत असू , तर आपण आर्थिक दृष्ट्या मुक्त म्हणजेच (Financial Free) आहोत.
मग जरी तुम्ही काम नाही केले तरी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये (Bank Account ) पैसे जमा झाले पाहिजेत.

मग हे पैसे कुठून येतील? असा प्रश्न पडला असेल तुम्हाला!

तर हे सर्व पैसे येतील तुमच्या गुंतवणुकीतून (Investments )….
मग ते तुम्हाला दर महिन्याला घर भाडे स्वरूपातून असोत, की शेअर्स डिव्हीडंट(Shares dividends)मधून असोत, की म्युचल फंड्स(Mutual Funds )मधून असोत, किंवा कोणत्याही बिजनेस मधूनअसोत, ज्या-ज्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक केलेली असेल. या सर्व सांगितलेल्या पर्यायांमध्ये तुमच्या सक्रिय सहभागाची (Actively Involved)गरज नसते.

आपण आपल्या जीवनातील गरजा भागवण्यासाठीच काम करत असतो. मग जरी आपल्याला काम करणं आवडत असो किंवा नसो! आपल्याला वाटतं, आपण जर कामच केले नाही तर पगार मिळणार नाही, आणि पगार मिळाला नाही, तर माझं कुटुंब कसं जीवन जगेल? आपल्याला आपला घर खर्च, लाईट बिल, पाणी बिल, क्रेडिट कार्ड, कर्जाचे हप्ते, गाडी असेल तर इंधन, सणासुदीला, नातेसंबंधामध्ये लग्न, बारसं, बर्थडे असे खूप साऱ्या खर्चासाठी पैसे हवे असतात.
ह्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी आपल्याला आर्थिक स्वातंत्र्याची गरज आहे

एक उदाहरण बघुया:

दोन मित्र आहेत एकाच नाव राम आणि दुसऱ्याच नाव श्याम आहे. राम हा नोकरी करत नाही. तो त्याने गुंतवलेल्या पर्यायांमधून(घर भाडे,शेअर्स डिव्हीडंट(Shares dividends), म्युचल फंड्स(Mutual Funds) किंवा बिजनेस) त्याला ५० हजार रुपये मिळतात आणि त्याचा महिन्याचा एकूण खर्च ५० हजार रुपये आहे. तो या ५० हजारामधून महिन्याचा खर्च भागवतो. रामने जरी काम नाही केलं तरी दर महिन्याला ५० हजार  रुपये त्याला येणारच आहेत म्हणून रामला आर्थिक स्वातंत्र्य आहे असं आपण म्हणू शकतो.

शाम याचा महिन्याचा खर्च १ लाख रुपये आहे पण तो नोकरी करूनच कमवतो. आणि तो राम प्रमाणे कोणतीच गुंतवणूक करत नाही. आता समजा जर त्याची नोकरी गेली तर तो महिन्याचा १ लाख रुपये भागवू शकत नाही. कारण त्याचा पैसे येण्याचा मार्गच  बंद झालेला असेल म्हणून शामला आर्थिक स्वातंत्र्य नाही. आता आपण या घटनेकडे कोणत्या दृष्टीने पाहतो हे हि महत्वाचे आहे. आर्थिक स्वातंत्र्याबद्दलची प्राथमिक माहिती आज आपण जाणून घेतली.

तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्द्ल तुमचा अभिप्राय कळवा. लवकरच भेटू!
नवीन विषय! नवीन लेख! फक्त आपल्या मराठी मातृभाषेत!
सारा इन्वेस्ट्मेन्ट्स
सुहास जोगळे


0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *