Types of Investments – गुंतवणुकीचे प्रकार

मागील दोन लेखातून गुंतवणूक आणि बचत म्हणजे काय ते पाहिलेले आहे. पण आता आपण गुंतवणुकीचे प्रकार(Types of Investments) कोण-कोणते आहेत ते पाहणार आहोत.

आजकाल सर्वांना असं वाटत असतं कि आपण गुंतवणूक केलेल्या कमीत कमी पैश्यामधून जास्तीत जास्त नफा किंवा मोबदला मिळाला पाहिजे, शिवाय जोखीम तर नकोच.

गुंतवणुकीच्या प्रकारात (Types of Investments) कमी-जास्त जोखीम

जोखीम बद्दल काही बोललो कि मला तर असच उत्तर मिळत “I can’t take risk with my money”  कारण जोखीम हि कोणालाही नकोच असते. कमी जोखीम आणि जास्त मोबदला. पण आपण यात सरमिसळ करून बसतो.

जेवढी जास्त जोखीम तेवढा परतावा जास्त, आणि याउलट जेवढी कमीत-कमी जोखीम तेवढा परतावा कमी.

आपण काही गुंतवणुकीचे काही प्रकार बघणार आहोत:

1. शेअर्स(Shares):

सन २०१९ मध्ये सर्वांनाच माहित झालेलं आहे कि शेअर्स म्हणजे काय आहेत. त्यामुळे ज्यांच्या कडे पैसे आहेत, त्यांना असं वाटत असतं कि शेअर्स मध्ये गुंतवणूक करावी.

पण कोणते शेअर्स घ्यावेत आणि कोणते शेअर्स घेऊ नयेत, ते कधी विकावे आणि ते किती कालावधी साठी ठेवावे याचं पुरेसं ज्ञान नसत. हो पण दीर्घमुदती साठी जर याचा विचार केला असता यात परतावा चांगला मिळू शकतो.

यामध्ये दोन प्रकार पाहिले जातात:

a. लाभांश(Dividend): कंपनीला होणाऱ्या निव्वळ नफ्यापैकी काही रक्कम भागधारकांना लाभांश स्वरुपात दिली जाते. आणि हा लाभांश करमुक्त असतो. शिवाय हा लाभांश वर्षातून एकदा किंवा दोन वेळा दिला जाऊ शकतो.

b. मूल्यवृद्धी(Growth): जस-जशी कंपनीची वाढ होत जाते, तस-तसे कंपनीचे शेअर्स मूल्य वाढत जाते. त्याप्रमाणे आपण याचा फायदा घेऊ शकतो. पण अश्या प्रकारच्या गुंतवणुकीत योग्य ज्ञान असणे महत्वाचे आहे. अन्यथा आपलं नुकसान होऊ शकत.

2. कर्जरोखे(Debt Bond):

केंद्र व राज्य सरकारे, महामंडळे आणि संस्था हे भांडवल उभारणी साठी अश्या प्रकारचे कर्जरोखे बाजारात विक्रीसाठी आणत असतात. यांची मुदत एक वर्ष किंवा जास्त कालावधीसाठी असू शकते.

यावर मिळणारा व्याजही ठराविक असतो, मुद्दल अधिक ठरलेल्या व्याजदराची रक्कम ठराविक दिवशी परत करण्याची हमी दिलेली असते. काही कर्जरोखे करमुक्त तर काही करपात्र असतात.

3. मुदतठेवी किंवा बँक ठेवी(Fixed Deposit):

हा पर्याय तर मध्यमवर्गीयांच्या आवडीचा आहे. बँक ठेवी, पोष्टाच्या ठेवी यात ठराविक मुदतीसाठी, ठराविक व्याज दराने पैसे गुंतवता येतात. या पर्यायामधून मासिक/ त्रेमासिक/ अर्धवार्षिक/ वार्षिक पद्धतीने व्याज घेता येते. 

बँकांमधून मिळणाऱ्या व्याजावर ठराविक रकमेच्या वर आपल्याला जास्त कर भरावा लागतो. या मध्ये जोखीम आणि परतावा कमी असतो.

4. म्युच्युअल फंड(Mutual Funds):

प्रत्येक वयोगटातील तसेच जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार या योजनांची मांडणी केलेली असते. गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठी योग्य प्रकारच्या योजनांची निवड करून आपल्या धनवृद्धी साठी फायदा करून घेता येतो.

या योजनेत बाजारातील चढ-उताराशी निगडित असल्याने यामध्ये निश्चित असा परतावा नसतो.  मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये कर सवलतही घेता येते.

म्युच्युअल फंडमध्ये खालील स्वरूपातून गुंतवणूक करू शकतो:

अ.    एस.आय.पी (SIP – सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन)
आ.  एक रकमी गुंतवणूक (याला आपण Lumpsum म्हणू शकतो)
इ.    एस.टी.पी. (STP – सिस्टिमॅटिव्ह ट्रान्सफर प्लॅन)
ई.    एस. डब्लू.पी. (SWP – सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन)

5. रोख स्वरूपातील योजना:

या स्वरूपातील योजनामध्ये उच्च तरलता असते, ट्रेझरीबिल(Treasury Bill, मनीमार्केट फंड(Money-Market Fund) , लिक्विड फंड(Liquid Funds) हे प्रकार यात मोडतात.

यामध्ये पैसे केव्हाही काढता येतात, तेव्हा काही गुंतवणूकदार या योजनेचा फायदा घेताना दिसतात. हा यातील फायदा असतो.

6. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी( PPF):

 हि गुंतवणूक सुद्धा अजूनही मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांमधील पसंतीची योजना आहे. या योजनेचा कार्यकाळ हा 15 वर्षाचा असतो.

खातेदार जास्तीत जास्त 50% रकमेपर्यंत अकाली पैसे काढू शकतो, पूर्णपणे पैसे यातून काढू शकत नाही.

7. जमीन-जुमला स्वरूपातील गुंतवणूक(Real Estate):

आपण ज्या घरात राहतो ती गुंतवणुकीत म्हणू नाही. पण दुसरं घर असेल, आणि त्यातून भाड्याच्या स्वरूपात पैसे मिळत असतील तर ही गुंतवणूक मानू शकतो.

यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करावी लागते, अश्या गुंतवणूकीसाठी आपल्याकडे तेवढी मोठी रोख रक्कम लागते. मालमत्ता लगेच विकता येत नाही, कारण विकत घेणाराही उपलब्ध असावा लागतो.

उदा. शेतजमीन, अर्ध शहरी जमीन, व्यावसायिक मालमत्ता, रो हाऊस किंवा फार्म हाऊस इत्यादींचा समावेश होतो.

8. सोने, चांदी, हिरे(Gold, Silver, Diamond):

या गुंतवणूकीला आपण भावनिक गुंतवणूक म्हणू शकतो, मात्र यामध्ये चोरी किंवा गहाळ होण्याची भीती सर्वात जास्त असते. गोल्ड बॉण्ड्स काही बँकांमध्ये मिळतात, यात बँक आपल्याला सोन्याच्या बाजारभावाप्रमाणे बॉण्ड्स देते. या बॉण्ड्स वर आपल्याला काही प्रमाणात व्याज मिळते.

9. नवीन पेन्शन योजना( NPS – New Pension Scheme):

जे लोक 2004 नंतर सरकारी सेवेन रुजू झाले आहेत किंवा इतरही लोकांसाठी सरकारने याची स्थापना केलीली आहे, यामध्ये आपण नियमितपणे दरमहा गुंतवणूक करू शकतो. 

यामध्ये कॉन्सर्व्हेटिव्ह, मॉडरेट व अग्ग्रेसिव्ह असे तीन गुंतवणूक पर्याय असतात. यामध्ये कलम 80 (क) मध्ये अतिरिक्त 50000 रुपयांची करसवलत मिळते ही पेन्शन योजना असल्याने यात तरलता कमी असते.

10. पी.एम.एस. (PMS – पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्विस):

सेबीच्या नियमाप्रमाणे किमान रु. 25 लाखाची गुंतवणूक करावी लागते. फंड मॅनेजर प्रत्येक गुंतवणूकदाराचे पैसे वैयक्तिक पातळीवर समभागांमध्ये गुंतवणूक करतात.

या गुंतवणुकीसाठी डिमॅट अकाउंट गरजेचे आहे. फक्त समभागांमध्ये गुंतवणूक असल्याने जोखीम वाढते मात्र जास्त परतावा मिळायची शक्यताही असते.

तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्द्ल तुमचा अभिप्राय कळवा. लवकरच भेटू!
नवीन विषय! नवीन लेख! फक्त आपल्या मराठी मातृभाषेत!
सारा इन्वेस्ट्मेन्ट्स
सुहास जोगळे

Categories: Investment

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *