Mutual Funds – म्युच्युअल फंड

आज अनेकांना असं वाटत असतं की म्युच्युअल फंड(Mutual Funds) आणि शेअर बाजारातील गुंतवणूक(Investment) म्हणजे एक प्रकारचा मटका-जुगार खेळच आहे असंच वाटत असतं किंवा गुंतवणूक म्हटलं की पूर्वी आपल्याला fixed deposit(FD) , Recurring deposit (RD), पोस्ट ऑफिस योजना हेच पर्याय समजले जायचे. आणि प्रश्न ही तसेच पडायचे की आपण गुंतवणूक करणार आहोत ती सुरक्षित आहे का? गुंतवणूक कुठे करायची? ती गुंतवणूक कशी करू शकतो? किंवा केव्हा करायची याचं ज्ञान अजूनही लोकांना नाही.

शेअर मार्केटमध्ये(Share Market) गुंतवणूक करणे किंवा विविध कंपन्यांचे शेअर्स घेणे हे काही समजत नाही, कारण कोणती कंपनी चांगली किंवा कोणती कंपनी वाईट हे आपल्याला असणाऱ्या अपुऱ्या ज्ञानामुळे कळत नाही. म्हणून आपल्याकडे पैसे असून देखील आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकत नाही. तर अशा लोकांसाठी ज्यांना शेअर मार्केटचं अपूर ज्ञान आहे आणि जे लोक गुंतवणूक करू पाहत आहेत. अश्या लोकांसाठी म्युच्युअल फंड हा एकमेव उत्तम पर्याय आहे.

म्युच्युअल फंड म्हणजे काय ते थोडक्यात समजून घेऊ. ज्या-ज्या लोकांना म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची आहे. अशा लोकांकडून म्हणजेच कोणाकडून 1000, कोणाकडून 2000, कोणाकडून 5000 अशी एक मोठी रक्कम जमा केली जाते. आणि हे पैसे Bonds, आणि विविध कंपन्यांचे स्टॉक्स या मध्ये गुंतवले जातात. आता हे पैसे कुठे-कुठे गुंतवले जातात याची काळजी करण्याची गरज नाही. कारण प्रत्येक फंड हाऊसमध्ये प्रोफेशनल्स लोकांची टीम असते त्यामध्ये एक महत्वाचा अधिकारी म्हणजे फंड मॅनेजर, हा आपल्या मार्फत पैसे गुंतवत असतो.

म्युच्युअल फंडाचे काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे:

  • तसं पाहिलं तर म्युच्युअल फंड हे भारतात प्रथम सरकारच्या सहभागाने युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना सन 1964 मध्ये करण्यात आली. या कंपनीला आपण भारतातील पहिली म्युच्युअल फंड कंपनी म्हणू शकतो.
  • त्यानंतर 1986 मध्ये सार्वजनिक बँकांना म्युच्युअल फंड स्थापण्याची परवानगी मिळाली.
  • तसेच  1991 पासून खाजगी म्युच्युअल फंडांना परवानगी देण्यात आली.
  • सध्या भारतात 44 म्युचल फंड कंपन्या कार्यरत आहेत.
  • म्युच्युअल फंड हे सेबी(SEBI) म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या गव्हर्मेंट बॉडी कडून नियंत्रित केले जातात.
  • आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असताना, आपण एकटे नसतो कारण आपल्यासारखे इतर लोकही असतात.
  • आपण गुंतवलेल्या पैशांनी चांगले काम करावे म्हणजे पैशांची वृद्धी व्हावी यासाठी तज्ञ लोक आपल्या वतीने पैसे गुंतवत असतात.
  • विशिष्ट ध्येयासाठी गुंतवलेले पैसे, असे पैसे एकत्र केले जातात आणि तुम्ही केलेल्या गुंतवणूकीच्या बदल्यात तुम्हाला युनिट्स(Units) दिले जातात.
  • मग हेच पैसे म्युच्युअल फंड कंपनीचे फंड मॅनेजर Stocks, Bonds आणि मनी मार्केट(Money Market) अश्या वेगवेगळ्या सिक्युरिटीज मध्ये गुंतवतात.
  • तुम्ही केलेली गुंतवणूक रुपये / त्या दिवशीचे गुंतवणूक मुल्य म्हणजेच NAV = तुम्हाला मिळालेले मिळालेले युनिट.
  • रोजच्या रोज गुंतवणूक मूल्यांकन केले जाते आणि त्या प्रत्येक युनिट चे मूल्य(NAV) जाहीर केले जाते.
  • अशा गुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंड(Mutual Funds) कंपन्या गुंतवणूकदारांकडून एक ठराविक खर्च प्रमाण(expense ratio )आकारतात. ते खर्च प्रमाण 2.5% पेक्षा जास्त नसते.
  • म्युच्युअल फंडामध्ये कमीत-कमी रुपये 500 पासूनपुढे गुंतवणूक करू शकतो.
  • त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये पारदर्शकता दिसून येते म्हणून म्युच्युअल फंड हे सर्व सामान्न्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

सूचना: म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांना गुंतवणुक करायची असल्यास आपल्या गुंतुवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे अथवा आपण स्वतः करत असल्यास आपणास म्युच्युअल फंडाचे पूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे.

तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्द्ल तुमचा अभिप्राय कळवा. लवकरच भेटू!
नवीन विषय! नवीन लेख! फक्त आपल्या मराठी मातृभाषेत!
सारा इन्वेस्ट्मेन्ट्स
सुहास जोगळे

Categories: Mutual Funds

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *