Best Personal Financial Tips – सर्वोत्तम वैयक्तिक आर्थिक टीपा

आर्थिक स्थिरता आज प्रत्येकाला हवी असते. कारण “पैसा” कितीही नको म्हटला तरी हवाच आहे. आज आपल्याला असे किती तरी लोक भेटतील, ते नेहमी म्हणत असतात कि, “पैसा कमवून कुठे जायचं आहे, हौस मौज महत्वाची आहे.” पण जेव्हा लोक आर्थिक अडचणीत सापडतात तेव्हा समस्या निर्माण होतात आणि चुकीचे निर्णय घेतले जातात. आपल्या आर्थिक भवितव्याचे रक्षण करण्यासाठी, आपल्याला खराब आर्थिक सवयी ओळखण्याची आणि आपण नियमितपणे त्या प्रकारच्या चुका करणे टाळण्याचे मार्ग समजण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. या लेखात आम्ही आपल्याला काही चांगल्या आर्थिक सवयी सांगणार आहोत. सर्वोत्तम वैयक्तिक आर्थिक टीपा(Best Personal Financial Tips) आज आपण पाहणार आहोत.

1. वैयक्तिक अर्थव्यवस्था आणि पैशाची बचत करण्याचा योग्य मार्ग यावर नियंत्रण ठेवा

वैयक्तिक अर्थव्यवस्था म्हणजे आपले पैसे व्यवस्थित व्यवस्थापित करणे जेणेकरून आपण कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणीत येऊ नये.

“खर्च करून उरलेल्या रकमेतून बचत करण्यापेक्षा, बचत करून उरलेल्या रकमेतून खर्च करा.”जगातील महान गुंतवणूकदार वॉरेन बफे

जगातील महान गुंतवणूकदार वॉरेन बफे

पैशाची बचत करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे:

(उत्पन्न (Income) – बचत (Savings) = खर्च(Expenses)म्हणजेच आपल्या उत्पन्नाच्या कमीतकमी १०% तरी पैसे बचत करणे गरजेचे आहे. उर्वरित ९०% पैसे आपण इतर खर्च करू शकतो.

2. पारंपारिक तसेच सुरक्षित गुंतवणूक

आपले पैसे गमावणे कोणालाही नको असत त्यासाठी काही सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपण बचत करणे सुरू करता त्या पैशाचे संरक्षण करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे.

जेणेकरून आपले पैसे कमी होणार नाहीत आणि त्याच वेळी या बचतीचा वापर सुरक्षित गुंतवणूकीसाठी करू शकतो. पारंपारिक गुंतवणूक म्हणजे आवर्ती ठेव(Recurring deposit ), मुदत ठेव(Fixed Deposit), पोस्ट ऑफिस योजना, भिशी, LIC इत्यादी होय.

आज जर आपण पाहिलं तर महागाई इतकी वाढलेली आहे, की त्यावर ही पारंपरिक गुंतवणूक आपल्याला फायदेशीर ठरत नाही. कारण आर्थिक नियोजन करताना महागाई वाढ हा एक महत्वाचा मुद्दा आहे.

महागाईमुळे क्रयशक्ती (Purchasing Power) कमी होते. समजा भारतामध्ये महागाई वाढीचा दर 7% आहे म्हणजेच आज 100 रुपयाला मिळणारी वस्तू हि पुढल्या वर्षी 107 रुपयाला मिळेल. महागाई मुळे खर्च वाढत जाणार.

आपण गुंतवलेल्या पैशांचे भविष्यातील मूल्य कमी होणार म्हणजे आजचे 100 रुपये हे पुढच्या वर्षीचे 93 रुपये होतील. म्हणून आपल्याला पारंपारिक गुंतवणुकीपेक्षा इतर अजून असे कोणते पर्याय आहेत ते पाहिले पाहिजेत.

गुंतवणुकीत तुमचे पैसे वाढत जातात कारण त्यावर मिळणारा चक्रवाढ व्याज हा तुमचे पैसे वाढवत असतो.

असे पर्याय म्हणजे शेअर बाजार, म्युच्युअल फंड. होय गुंतवणुकीत जोखीम तर आहेच पण योग्य ज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने ती कमी करून आपण चांगले रिटर्न मिळवू शकतो.

कारण गुंतवणूक ही अशी(100×100) वाढते, आपले पैसे वाढत गेले पाहिजेत. नाही कि महागाई मुळे त्याची किंमत कमी झाली पाहिजे भविष्यात वाढणाऱ्या महागाई वर आपल्याला सहज मात करता आलं पाहिजे.

1. आपले पैसे कधीही गमावू नका.

2. नेहमीच नियम क्र. 1 लक्षात ठेवा.वॉरेन बफे यांनी म्हटल्याप्रमाणे -सुरक्षित गुंतवणूकीचे दोन नियम आहेत:

वॉरेन बफे यांनी म्हटल्याप्रमाणे -सुरक्षित गुंतवणूकीचे दोन नियम आहेत:

आणि म्हणून तुमच्या बचतीच्या पैशाची सुरक्षितपणे गुंतवणूक करणे ही तुमची सर्वात मोठी आर्थिक जबाबदारी आहे. 

गुंतवणूक म्हणजे काय? याबद्दल मी तपशीलवार लेख लिहिला आहे.आपण येथे क्लिक करुन वाचू शकता. Click

3. सक्रिय(Active) आणि निष्क्रिय(Passive) उत्पन्नाबद्दल माहिती समजून घेणे

आपल्याला लहानपणापासून हेच शिकवले जाते की अभ्यास कर, चांगले मार्क मिळव. कारण पैसे मिळवण्यासाठी काबाड कष्ट करावे लागतात. आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतात. सध्या तिन्ही माध्यमातून उत्पन्न आपण मिळवू शकतो:

सक्रिय(Active Income):- एखाद्या कामात आपल्याला सक्रियपणे काम करावं लागतं त्याला सक्रिय उत्पन्न म्हणतात.

म्हणजे ज्यासाठी आपल्याला नोकरी करणे, स्वतः दुकान-क्लिनिक चालवले. या सारखे सक्रियपणे कार्य करावे लागेल.

निष्क्रिय(Passive Income) उत्पन्न:- या उत्पन्नासाठी आपल्याला काम करण्याची गरज नाही, परंतु आपण तयार केलेली यंत्रणा कार्य करते आणि आपल्याला त्यातून पैसे मिळतात.

उदाहरणार्थ: भाड्याचे उत्पन्न, पुस्तक लेखनातून रॉयल्टी, युटूबर उत्पन्न आणि इंटरनेट वेबसाइट ब्लॉगवरील उत्पन्न, Online मार्केटिंग आणि ज्या व्यवसायात आपण गुंतवणूक केली आहे आणि त्यातून मिळणारे उत्पन्न. पण आपल्या सक्रिय सहभागाची आवश्यकता नसते.

पोर्टफोलिओ उत्पन्न: यामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या गुंतवणूकींमधून मिळते, जसे स्टॉक बॉन्ड्स आणि म्युच्युअल फंडांचे उत्पन्न किंवा बँक मुदत ठेवी योजना इत्यादी.

4. आपला अर्थसंकल्प तयार करणे(Financial Budget)

अर्थसंकल्पाचा अर्थ असा आहे की – आपण आपल्या गरजेनुसार पैसे योग्यरित्या खर्च करा, व्यर्थ खर्च टाळा म्हणजे प्रत्येक महिन्याच्या शेवटी येणारा पैशाचा त्रास टाळता येईल, कारण बऱ्याच जणांचे महिना अखेर बजेट कोलमडलेले असते.

आपल्या महिन्याच्या उत्पन्नातून किती बचत किंवा गुंतवणूक, कोणते खर्च, किती देणी द्यायची आहेत. इत्यादी याचा आराखडा म्हणजेच, थोडक्यात आपला स्वतःचा अर्थसंकल्प म्हणू शकतो.

5. शॉपिंगला जाण्यापूर्वी त्याची यादी बनवा(Make a Shopping List)

जगातील महान गुंतवणूकदर वॉरेन बफे म्हणतात की, “आपण ज्या वस्तू आपल्याला आवश्यक नसतील, अश्या वस्तू विकत घेतल्यास लवकरच आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू विकाव्या लागतील.”

म्हणून नेहमी शॉपिंगला जाण्यापूर्वी त्याची यादी बनवली पाहिजे. नाही तर आपल्याला नको असलेल्या वस्तू विकत घेतो आणि वायफळ खर्च होतो. शॉपिंग करताना आपल्याला जराही या गोष्टी लक्ष्यात येत नाहीत. 

6. क्रेडिट कार्डचा वापर कमीत कमी करा

या विषयावर बरेच लोकांची दुमते असू शकतात. क्रेडिट कार्ड तसं चांगलं हि आहे आणि वाईट हि आहे. शेवटी क्रेडीट कार्ड वापरणारे कसे वापरतात यावर सर्व अवलंबून असतं. लोक क्रेडिट कार्ड घेतात पण नको त्या वस्तू विकत घेत राहतात, कर्ज काढतात आणि महिने नि महिने हप्ते फेडत बसतात.

शिवाय एक कार्ड असताना दुसरही घेतात, खर तर या चक्रव्युहात ते अडकत असतात. क्रेडीट म्हणजे 30 ते 50 दिवसांसाठी बिना व्याजाने आपल्याला पैसे वापरायला मिळतात. खरे पण त्याचा बिल हे भरावे लागते.

क्रेडिट कार्डचा योग्य वापर कुठे होतो? जर घरात एखादी मेडिकल इमर्जन्सी आली आणि पैसे उपलब्ध नसतील तर आजकाल सर्वच हॉस्पिटल क्रेडिट कार्ड स्वीकारतात. आपण क्रेडिट कार्ड ने पेमेंट करू शकतो आणि त्याचं बिल भरायला 30  ते 50 दिवसांचा कालावधी मिळतो ते ही बिन व्याजी असतं. या दरम्यान पैशांची व्यवस्था करून आपण बिल भरू शकतो. पण क्रेडीट कार्डचा वापर कमी कराच. माझ्यामते जर कार्ड नसेल तर अतिउत्तम, तुमचा दर महिन्याला होणारा वायफळ खर्च कमी होईल आणि बिलाच्या चक्रात अडकणार ही नाही.

7. इन्शुरन्स आणि मेडिक्लेम(Insurance Policy)

इन्शुरन्स(टर्म प्लान) का? समजा मी महिन्याला 50,000 रुपये कमावतो आणि ती माझ्या कुटुंबाची महिन्याची गरज आहे. उद्या माझं काही बर वाईट झालं तर माझा इन्शुरन्स इतक्या रुपयांचा हवा की माझ्या मागे माझ्या कुटुंबाला जे इन्शुरन्सचे पैसे मिळतील ते बँकेत ठेवून दर महिन्याला 50,000 रुपयांचं व्याज मिळायाला हवं.

या मध्ये आपल्या पगाराच्या 10 पट आपल्याला इन्शुरन्स मिळतो. 50 ते 60 हजारांसाठी माझा इन्शुरन्स कमीत कमी 1 कोटींचा असावा, म्हणजे मी जरी नसलो, तरी माझ्या मागे माझ्या कुटुंबाला संरक्षण देईल आणि काही प्रमाणात आर्थिक अडचणी दूर होतील.

मेडिक्लेम का? आपल्या घरी कुणी आजारी पडलं आणि 24 तासापेक्षा जास्त तास ती व्यक्ती हॉस्पिटल ऍडमिट असेल तर आपला सर्व मेडिकल खर्च या पोलीसीतून दिला जातो. आज अशी परिस्थिती आहे कि आपण हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाल्याबरोबर मेडिकल बिल वाढायला लागतो आणि आपल्यालाआर्थिक चणचण भासू लागते. मग कोनाकडून पैसे उधार घेणे, कर्ज काढणे अश्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. पण जर आपण मेडिक्लेम पॉलिसी घेतली असेल तर त्याची काळजी इन्शुरन्स कंपनी घेईल.

8. आर्थिक नियोजन करणे(Financial Planning)

आर्थिक नियोजनाचा अर्थ असा आहे की – आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या खर्चासाठी त्यांच्यासाठी आपण आधीपासूनच योजना आखत आहोत. आर्थिक नियोजन का? जसे – मुलांच्या शैक्षणिक आणि लग्न खर्चासाठी, सेवानिवृत्ती, घर खर्च, कार खर्च, स्वदेशातील किंवा विदेशातील सहली, आणि मुख्य म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य इत्यादींसाठी बचत आणि गुंतवणूकीचा वापर करुन निधी तयार करणे याचा आपण काहीसे आर्थिक नियोजन करणे म्हणू शकतो.

तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्द्ल तुमचा अभिप्राय कळवा. लवकरच भेटू!
नवीन विषय! नवीन लेख! फक्त आपल्या मराठी मातृभाषेत!
सारा इन्वेस्ट्मेन्ट्स
सुहास जोगळे

Categories: Investment

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *